Latest

सातारा-ठोसेघर रस्त्यावर सज्जनगड जवळ दरड कोसळली

मोहन कारंडे

परळी; पुढारी वृत्तसेवा : साताऱ्यात मुसळधार पावसामुळे सज्जनगड येथे दरड कोसळली. सातारा-ठोसेघर रस्त्यावर शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दोन्ही बाजूची वाहतूक काहीकाळ ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.

गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यात धुवाँधार पाऊस सुरू आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसाने शुक्रवारी रात्री सज्जनगड जवळ तिसऱ्या दिवशीही दरड कोसळली. सततच्या पावसाने डोंगरकडावरील भाग निसरडा झाला आहे. या घटनेतून काही वाहनचालक बचावल्याने जीवितहानी टळली. दरड कोसळल्यानंतर घटनास्थळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत मार्गावरील दगड, माती बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांनी व पर्यटकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT