Latest

सातारा अपघात : भरधाव कारने दुचाकींना उडवले; २ जण ठार, चालक ताब्‍यात

निलेश पोतदार

खंडाळा; पुढारी वृत्तसेवा : म्हावशी (ता. खंडाळा) येथे काल (शुक्रवार) रात्री भरधाव वेगात असलेल्या कारने दोन दुचाकींना उडवले. या अपघातात दोनजण जागीच ठार झाले. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी खंडाळा पोलिसांनी संबंधित कार चालकास ताब्यात घेतले आहे. चालक हा मद्यपान करून कार चालवत असल्याचे समोर आले आहे.

अनिकेत भरत हेळकर (वय 27, रा. सोनगिरवाडी, ता. वाई) हा दारूच्या नशेत स्विफ्ट कारने (क्रमांक एम. एच. 02. बीआर. 4246) वाईकडून खंडाळ्याकडे निघाला होता. ही कार क्युबेल्ट कंपनीसमोर आली असता, टीव्हीएस (क्रमांक एम.एच.11. सीई 4610) व अ‍ॅक्टिव्हा (क्रमांक एम. एच. 11. डीएफ. 3717) या दोन वाहनांना जोरदार धडक दिली. यामध्ये टीव्हीएस मोटार सायकलवरील सुभाष बापुराव धायगुडे (वय 73) आणि शिवाजी साहेबराव धायगुडे (वय 65) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अ‍ॅक्टिव्हावरील अश्विनी तानाजी धायगुडे (वय 33) व भाग्यश्री सतिश धायगुडे (वय 30, रा. अहिरे ता. खंडाळा) या गंभीर जखमी झाल्या. या अपघातानंतर पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे.

या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. यामुळे बघ्यांची गर्दी झाली. काही नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जखमींना उपचारासाठी सातारा जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर मृतदेह ताब्यात घेवून पंचनाम्यासाठी पाठवण्यात आला आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT