Latest

पाचगणीच्या टेबल लँडवर वावटळ ; पर्यटक भयभीत (video)

अविनाश सुतार

सातारा : पुढारी वृत्तसेवा : थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या पाचगणी येथील टेबल लँडवर मोठ्या स्वरूपात वावटळ तयार झालेले पाहायला मिळाले. सध्या हवेत उष्मा मोठ्या प्रमाणात वाढलेला असल्याने पर्यटक हे महाबळेश्वर, पाचगणीमध्ये पर्यटनाचा आनंद लुटताना दिसत आहेत.

यातच दुपारच्या सुमारास मोठ्या स्वरूपात वावटळ तयार झाल्यामुळे काही वेळासाठी पर्यटक या ठिकाणी भयभीत झालेले पाहायला मिळाले. या वावटळामुळे टेबल लँडवर असणाऱ्या काही दुकानाच्या छताचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : 'झुंड' मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा | jhund movie

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT