Latest

सकारात्मक बातमी ! सासवड नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात प्रथम

अमृता चौगुले

सासवड : पुढारी वृत्तसेवा : स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये वॉटर प्लस हे उच्चतम मानांकन मिळवून सासवड नगरपरिषद देशपातळीवर प्रथम आली आहे. दि. ११ जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. पुरस्काराचे श्रेय सासवडकर नागरिकांना आहे. येथून पुढे आमची जबाबदारी अजून वाढलेली असून, आम्ही उच्च कामगिरीबद्दल प्रयत्नशील राहू, असे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी सांगितले की, स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करणे, लोकसहभागामध्ये स्वच्छ टायकोथॉन स्पर्धा, झिरो वेस्ट इंव्हेट, स्वच्छ इनोव्हेटिव्ह स्पर्धा, स्वच्छ शौचालय अभियान, स्वच्छतेविषयी जनजागृती यांचा समावेश होता. सासवड नगरपरिषदेमार्फत स्वच्छतेविषयी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. या पुरस्कारामध्ये सर्व राष्ट्रपतींच्या हस्ते मिळणार पुरस्कार आ. संजय जगताप यांची माहिती

पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचे खऱ्या अथनि यश आहे. याच पध्दतीने पुढे देशपातळीवरील स्वच्छतेबाबत सासवडचे नाव अग्रेसर ठेवू. कै. ना. चंदुकाका जगताप यांच्या स्वच्छतेच्या प्रेरणेतून आम्ही स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहोत. विविध उपक्रम राबवीत आहोत. नागरिकांच्या स्वच्छतेविषयीची समस्या, उघड्यावर पडणारा कचरा, ओला व सुका कचरा, याविषयी काम करीत आहोत. यामध्ये नागरिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळत असल्याचे नगरपरिषदेचे आरोग्य विभागप्रमुख मोहन चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT