Latest

sara tendulkar : सारा सचिन तेंडुलकरची ‘DATE NIGHT’ चर्चेत !

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (sara tendulkar) सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. नेहमी आपल्या दैनंदिन जीवनातील घडामोडी सोशल मीडियावर शेअर करत असते. साराच्या फोटो आणि व्हिडिओंवर चाहते अनेकदा प्रतिक्रिया देतात.

दरम्यान, सारा एका खास पोस्टमुळे जोरदार चर्चेत आली आहे. एक खास डेट नाईटचा फोटो शेअर करून तिने धुमाकूळ घातला आहे. साराने हा फोटो इन्स्टाग्रामवर डेट नाईट म्हणत फोटो शेअर केला आहे.

इन्स्टाग्रामवर तिने एक स्टोरी शेअर करत स्पेशल डेट नाईट असा कॅप्शन दिला आहे. यामध्ये बॉलिवूड गायिका कनिका कपूरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती कोणाचा तरी हात धरलेली दिसत आहे. कनिका कपूरनेही तिच्या अकाऊंटवरून असाच एक फोटो शेअर केला आहे.

sara tendulkar : सारा आणि कणिका खास मैत्रिणी

सारा आणि कणिका खास मैत्रिणी आहेत. त्या दोघीही सोशल मीडियावर जोरदार अॅक्टिव्ह दिसतात. या दोघी मागच्या काही दिवसांपुर्वी लंडनमध्ये अनेकदा एकत्र फिरत असतात.

साराने काही दिवसांपूर्वी तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकरसोबतचा एक फोटो शेअर केला होता. तत्पूर्वी, तिने लंडनमध्ये मित्रांसोबत २४वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाचे फोटोही तिने शेअर केले आहेत.

सारा तेंडुलकरचे नाव भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलसोबत जोडण्यात आले आहे. सारा आणि शुभमन अनेकदा इव्हेंट्स आणि पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले आहेत.

सचिनकडून गिलचे कौतुक

मास्टर-ब्लास्टर सचिनने भारतीय क्रिकेट संघाचा युवा कसोटी सलामीवीर शुभमन गिलच्या फलंदाजीचे कौतुक केले आहे. सचिन म्हणतो की, त्याला खडतर आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर खेळण्याचा अनुभव आहे. त्याची तांत्रीक दृष्ट्या कोणतीही अडचण नाही.

शुभमनकडून सुरुवात चांगली झाली आहे, पण आता त्याने मोठ्या डावांची खेळी करण्याची वेळ आली आहे.

सचिन पुढे म्हणाला की, संघात आल्यानंतर मोठी धावसंख्या करणे ही त्याच्या अंगी असलेली भूक असते. त्याला फक्त चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करायचे आहे आणि त्यासाठी त्याची एकाग्रता कायम ठेवली पाहिजे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT