Latest

Shri Dnyaneshwar Maharaj : अलंकापुरीत संत ज्ञानेश्वर जन्मोत्सव ; माउलींच्या समाधीवर पुष्पवृष्टी

अमृता चौगुले

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : माउलींच्या अलंकापुरीत (आळंदी) संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्री ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव व भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. बुधवारी (दि. 6) पहाटे 11 ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात माउलींच्या समाधीस अभिषेक घालण्यात आला. दुपारी 12 च्या सुमारास अखंड हरिनाम सप्ताहात आयोजित करण्यात आलेल्या गाथा-भजनाने सांगता करण्यात आली. रात्री 10 ते 12 विठ्ठल महाराज, मौजे यांच्या वतीने ह.भ.प. नारायण महाराज जाधव यांचे माउलींच्या जन्माचे कीर्तन झाले. पालखी सोहळाप्रमुख अ‍ॅड. विश्वस्त विकास ढगे पाटील यांच्या वतीने गोकूळ पूजा व मानकरी नारळ, प्रसाद वाटप करण्यात आले. माजी सभापती डी. डी. भोसले पाटील यांच्या वतीने खिरापत म्हणून खिचडी वाटप करण्यात आली.

दरम्यान, श्री ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सवानिमित्त साडेअकरा ते पावणेबाराच्या दरम्यान मंदिरातील सर्व भाविकांना पुष्प वाटण्यात आले. रात्री बारा वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सवावेळी भाविकांनी माउलींवर पुष्पवृष्टी केली तसेच मंदिर परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती.

तद्नंतर श्रींची आरती झाली. या वेळी पालखी सोहळाप्रमुख विश्वस्त अ‍ॅड. विकास ढगे पाटील, प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, माजी सभापती डी. डी. भोसले पाटील, बाळासाहेब चोपदार, माउलींचे मानकरी योगीराज कुर्‍हाडे पाटील, राहुल चिताळकर पाटील, योगेश आरु, स्वप्नील कुर्‍हाडे पाटील, मंदिरातील कर्मचारीवर्ग तसेच बहुसंख्येने भाविक उपस्थित होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT