Latest

Sanjay Raut : जवान शहीद झाले असताना स्वतःवर फुले उधळून घेताय; राऊतांचा हल्लाबोल

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत आतापर्यंत चार जवान शहीद झाले आहेत. तर आणखी दोन जवान जखमी झाले आहेत. यावरुन माध्यमांशी बोलत असताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्याचबरोबर राज्य सरकारवरही टीकेची झोड उठवली. (Sanjay Raut)

Sanjay Raut : जवान शहीद होताना भाजप उत्साह साजरा करतय

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलत असताना म्हणाले की, दक्षिण काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत आतापर्यंत चार जवान शहीद झाले आहेत. सारा देश दुखात बुडाला आहे आणि आमचे पंतप्रधान दिल्लीच्या पक्षाच्या कार्यालयात फुले उधळून घेत आहे. जवान शहीद होताना भाजप उत्साह साजरा करत आहे."

त्याचबरोबर राऊत यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यावरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, "देशाची अंतर्गत सुरुक्षा संरक्षणमंत्र्यांची जबाबदारी आहे. जवान शहीद होत असताना संरभण मंत्री फुले उधळण्यात व्यस्त आहेत. सनातन धर्मावरुन टीका करणारे शहीद झालेल्यांच्या घरी गेलेत का? असाही सवाल त्यांनी यावेळी केला.

भारत-इंडिया यावरुन चाललेल्या वादावरुन राऊत म्हणाले की,"हुकूमशीहीच्या विरोधाल लढण्यासाठी इंडियाची स्थापना केली आहे. पण राजकारणासाठी इंडियाचा भारत केला. पण चार जवान शहीद झाले तेही भारताचे सुपुत्र  होते.

संबधित बातम्या

मराठवाड्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम

देश कोणत्या दिशेने चालला आहे? असं म्हणत ते असही म्हणाले की, "महाराष्ट्रातही  वेगळी परिस्थिती नाही. राज्यात एक सरकार एक वर्षाहून अधिक बेकायदेशीर काम करत आहे. राज्यातील हे सरकार बेकायदेशीर, घटनाबाह्य आहे. बेकायदेशीर सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा कोर्टात टिकणार नाही. ज्या अधिकाऱ्यांनी हे निर्णय दिले त्यांना कोर्टात जबाब द्यावा लागणार आहे. पुढे बोलत असताना ते असेही म्हणाले की,"शासन आपल्या दारी कार्यक्रमात भ्रष्टाचाराचं रॅकेट आहे. अनेक प्रश्न मराठवाड्यात आहेत. फडणवीसांनी केलेल्या घोषणांमधून मराठवाड्याला काय मिळाल? हे सरकार मराठवाड्याच्या तोंडाला पानं पुसण्याच काम करत आहे.

शिंदे सरकारला थाटामाटाचं व्यसन 

माध्यमांशी बोलत असताना राऊत यांनी राज्यसरकारवरही निशाणा साधला. बोलत असताना ते म्हणाले की," शिंदे सरकारला थाटामाटाचं व्यसन आहे. पण हे सरकार थाटामाट मरणार आहे आणि आम्ही अंत्यसंस्कारही थाटामाटात करणार आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT