Latest

Sanjay Raut on KCR : संजय राऊतांचा ‘केसीआर’ यांच्यावर हल्लाबोल म्हणाले, ‘त्यांचे नाटक…’

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Sanjay Raut on KCR : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणताही प्रभाव पडणार नाही. केसीआर यांनी असे नाटक केले तर ते तेलंगणालाही गमावतील. नुकसानीच्या भीतीने ते महाराष्ट्रात आले पण काल त्यांचे 12-13 मंत्री/खासदार काँग्रेसमध्ये दाखल झाले. केसीआर आणि काँग्रेस यांच्यात ही लढत आहे. महाराष्ट्रात MVA मजबूत आहे, असे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव (केसीआर) यांनी आज सकाळी पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते भगीरथ भालके यांचा केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात प्रवेश होणार आहे. यानिमित्त केसीआर हे आपल्या मंत्री, खासदार, आमदार, अधिकाऱ्यांच्या लवाजम्यासह सोमवारपासून दोन दिवसीय सोलापूर शहर- जिल्हा दौऱ्यावर आहेत. Sanjay Raut on KCR

केसीआर सोमवारी (दि. २६) दुपारी चारच्या सुमारास हैदराबादहून सुमारे ३०० गाड्यांचा ताफा शक्तिप्रदर्शन करीत सोलापुरात दाखल झाले होते. सोलापुरात मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले होते. आज केसीआर यांनी पंढरपूरमध्ये येऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. यानंतर सरकोली येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे.

केसीआर भाजपची 'B' टीम

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, केसीआर यांचा तेलंगणात मूळ लढत काँग्रेसशी आहे.  कारण त्यांच्या पक्षातील 12-13 मंत्री आणि खासदार काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. केसीआर तेलंगणातसुद्धा हारतील अशी चिन्हे आहेत. त्या भीतीने ते महाराष्ट्रात आले आहेत. महाराष्ट्रात ते मोठा काफिला घेऊन फिरत आहे. मोठ-मोठे होर्डिंग्ज लावले आहेत. मात्र माझे मत आहे, त्यांनी तेलंगणातच लक्ष द्यावे. संवाद साधून प्रश्न सोडवावेत. मात्र, तेलंगणातील बदला जर ते महाराष्ट्रात येऊन घेणार असतील तर मी त्यांना भाजपची B टीम म्हणेल. तुम्ही भाजपसाठी काम करत आहात आणि याचे परिणाम त्यांना तेलंगणात भोगावे लागतील.

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणताही प्रभाव पडणार नाही. महाराष्ट्रात MVA मजबूत आहे, असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.  Sanjay Raut on KCR

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT