Latest

…तर फडणवीस सुध्दा शिवसेनेलाच मतदान करतील : संजय राऊत

निलेश पोतदार

मुंबई : पुढारी ऑनलाईन पंकजा मुंडेंना भाजपमध्ये एकाकी पाडण्याचा फडणवीसांचा डाव आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर केली. पंकजा मुंडे आणि शिवसेनेचं जिव्हाळ्याचं नातं आहे. आम्‍हाला पंकजा मुंडे यांची चिंता करण्याचा अधिकार आहे अशी भूमीका राऊत यांनी माध्यमांसमोर मांडली.

महाराष्‍ट्रासह देशभरात निवडणुकीचं जे चित्र स्‍पष्‍ट झालं त्‍यात काही नवं नाही. केंद्र सरकारकडून शासकीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आमच्याकडेही यंत्रणा आहे, मात्र ईडी नसल्‍याचा खोचक टोला त्‍यांनी यावेळी भाजपला लगावला. ईडी ला ४८ तासांसाठी आमच्या हातात दिले तर फडणवीस सुध्दा शिवसेनेला मतदान करतील असे राऊत म्‍हणाले.

कोणत्‍याही अपक्षांचा अवमान करण्याचा प्रश्न नाही. अता निवडणूक झाली आहे. त्‍यामुळे तो विषय संपल्‍याचे सांगत राज्‍यसभेतील पराभवाच्या प्रश्नावर बोलण्याचे त्‍यांनी टाळले.

राष्‍ट्रपती निवडणूकीसंदर्भात ममता बॅनर्जी यांनी १५ जूनला दिल्‍ली मध्ये बैठकीचे आयोजन केले आहे. ममता बॅनर्जींनी देशभरातील २२ नेत्‍यांना पत्र लिहून बैठकीच निमंत्रण दिलं आहे. या बैठकीला शिवसेनाही उपस्‍थित राहणार असल्‍याचं त्‍यांनी सांगितलं.

हे ही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT