Latest

Sania Ashiq : महिला आमदाराचा बॉयफ्रेंडसोबतचा अश्लील Video Viral झाल्याने खळबळ

backup backup

पाकिस्तानची एक महिला आमदार सध्या चर्चेत आहे. सानिया आशिक (Sania Ashiq) असे या महिला आमदाराचे नाव आहे. आमदाराचा अश्लिल व्हिडिओ व्हायरल करून धमकावल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. खुद्द महिला आमदाराने त्या व्यक्तीची पोलिसात तक्रार दिल्यानंतर हा सर्व प्रकार घडला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

वास्तविक, सानिया आशिक (Sania Ashiq) ही पाकिस्तान मुस्लिम लीग नवाजची नेता आहे आणि पंजाब प्रांतातील तक्षशिला विधानसभेची आमदार आहे. 'द नेशन'च्या वृत्तानुसार, सानिया आशिकने २६ ऑक्टोबर रोजी सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणेकडे व्हिडिओबद्दल तक्रार केली होती. तपासानंतर पोलिसांनी व्हिडिओ लीक केल्याप्रकरणी एकाला अटक केली. सोशल मीडियावर लोक त्याला सानिया आशिकचा बॉयफ्रेंड म्हणत आहेत.

रिपोर्टनुसार, सानियाने (Sania Ashiq) तिच्या निवेदनात म्हटले आहे की, माझा व्हिडिओ टिकटॉकवर व्हायरल करण्याव्यतिरिक्त तिने इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो देखील पोस्ट केले आहेत. व्हिडिओतील महिला माझ्यासारखी दिसते. माझ्याशी संबंधित क्लिप व्हायरल करून माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे, मला धमकीचे फोनही येत आहेत.

तथापि, अहवालात असेही नमूद केले आहे की एजन्सीने या प्रकरणी अद्याप कोणतेही विधान जारी केले नाही. दुसरीकडे, व्हिडिओमध्ये दिसणारी महिला सानिया आशिक असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

सध्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. सानिया ही नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांच्या खूप जवळची मानली जाते. वेगवेगळ्या मुद्द्यांवर ती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना घेरते.

हे ही वाचलं का?

SCROLL FOR NEXT