पुढारी ऑनलाईन ; पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील दिडबा येथे विषारी दारू पिल्याने सुरू झालेली मृत्यूची मालिका अद्याप सुरूच आहे. बुधवारी विषारी दारू पिल्याने पाच लोकांचा मृत्यू झाला होता. तर डझनभर लोकांची प्रकृती बिघडल्यान त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आले होते. दरम्यान आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे मृतांची संख्या २१ वर पोहोचली आहे.
दरम्यान राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या प्रकरणी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांकडून चार आठवड्यात या घटनेचा अहवाल मागवला आहे. पोलिसांच्या मते, संगरूरचे गाव गुजरां मध्ये १८ आणि १९ मार्च रोजी कामगारांनी स्वस्तातली दारू पिली होती. यानंतर या सर्वांची तब्येत बिघडायला लागली. यानंतर त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आले. यानंतर एक-एक करत तब्बल ८ लोकांचा मृत्यू झाला.
विषारी दारू प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चार लोकांना अटक केली आहे. विशेष पोलिस महानिरिक्षक अर्पित शुक्ला यांनी सांगितले की, या प्रकरणी चार लोकांना अटक केली आहे. यामध्ये पटियालातील हरमनप्रीत सिंह, सुखविंदर सिंह, मनप्रीत सिंह आणि गुरलाल सिंह यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून २०० लिटर इथेनॉल आणि दारूच्या १५६ बाटल्या जप्त
या दरम्यान पोलिसांनी २०० लिटर इथेनॉल आणि दारूच्या १५६ बाटल्या जप्त केल्या आहेत. या शिवाय लेबल चिकटवलेल्या १३० बनावट दारूच्या बाटल्या, लेबल नसलेल्या बनावट दारूच्या ८० बाटल्या, ४,५०० रिकाम्या बाटल्या आणि बॉटलिंग मशिनही जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, चार लोकांसोबतच एका टोळीचा भांडाफोड केला आहे.
हेही वाचा :