Latest

सांगली : आटपाडीमध्ये सकल हिंदू समाजातर्फे भव्य मोर्चा

अमृता चौगुले

आटपाडी, पुढारी वृत्तसेवा : आटपाडी येथील ख्रिस्ती धर्म प्रचारक संजय गेळे या वडा पाव विकणाऱ्याच्या संपत्तीची चौकशी करा,गोठा म्हणून बांधलेल्या चर्चवर बुलडोझर फिरवा, महिलेशी लैंगिक गैरवर्तन केल्याचा गुन्हा दाखल करा अन्यथा जनता कायदा हातात घेईल असा इशारा आमदार राम सातपुते यांनी दिला.

आटपाडी मध्ये सकल हिंदू समाजातर्फे बसस्थानक ते तहसील कार्यालय दरम्यान निघालेल्या भव्य मोर्चा नंतर ते बोलत होते. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी दिलेल्या पैशावर गेळे मोठा झाला. पोलिसांनी मोर्चाचा इशारा दिल्यावर त्याला अटक केली. बाटलेल्या पिलावळीला मिळणारे संरक्षण खपवून घेणार नाही. हिंदुत्ववादी विचारांचे सरकार सत्तेत असल्याने अफजल खान दर्गा बुलडोझरने साफ केला. आता कारवाई न झाल्यास चर्चवर बुलडोझर फिरवू असा इशारा दिला.

नितीन शिंदे म्हणाले, हिंदु एकवटला आणि बाबरी पडून राममंदिर बांधले जात आहे.अफजल खान दरग्यावर बुलडोझर फिरवला.आता विशाळगड मुक्ती मोहीम आम्ही हाती घेतली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार जाऊन हिंदुत्ववादी सरकार आले असून आहे. आम्ही चुकीच्या गोष्टी मोडून काढू. लव्ह जिहाद खपवून घेणार नाही.धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांना पायाखाली तुडवू असा इशारा दिला.त्यांना संरक्षण देणाऱ्यांना गडचिरोलीला पाठवावे लागेल असे स्पष्ट करत धर्म बदलनाऱ्यांना पुन्हा सन्मानाने हिंदु समाजात स्थान द्या असे आवाहन केले.

मोहनराव देशमुख म्हणाले, यापूर्वी एका धर्म प्रसरकाला आटपाडीकरांनी टोले देऊन हाकलले आहे. आता गेळेच्या हॉटेलवर बहिष्कार टाका.एकजूट होऊन लढा देऊया.

मोर्चानंतर झालेल्या भाषणात महाविकास आघाडीवर झालेल्या टिके बद्दल संयोजनात असलेल्या व्यक्तींना याबाबत जाब विचारत सौरभ पाटील व सहका-यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

.हेही वाचा  

SCROLL FOR NEXT