Latest

सांगली : फॉरेन रिटर्न बनली थेट सरपंच; वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी गावची धुरा घेतली हातात

backup backup

सांगली, पुढारी वृत्तसेवा : जॉर्जिया येथे वैद्यकीय शिक्षण घेतलेली फॉरेन रिटर्न यशोधरा महेंद्रसिंग शिंदे या तरुणीने वड्डी (ता. मिरज) येथील सरपंच पदावर बाजी मारली. यशोधरा शिंदे या अवघ्या २१ व्या वर्षी सर्वात तरुण महिला सरपंच देखील बनल्या आहेत. या निवडणुकीत शिंदे यांच्या पॅनलचा एकतर्फी विजय झाला असून निवडणुकीत त्यांनी विरोधकांचा सुपडा साफ केला आहे. मिरजेपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या आणि केवळ पाच हजार लोकवस्ती असणाऱ्या वड्डी या गावात ही किमया घडली आहे.

यशोधराराजे शिंदे यांनी जॉर्जिया येथे वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. जॉर्जिया येथे वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर मोठमोठ्या रुग्णालयात असणाऱ्या गलेलठ्ठ पगाराच्या नोकरी धुडकावून त्यांनी राजकारणाची वाट धरली आहे. विदेशातील निवडणुकीप्रमाणे त्यांनी वड्डी या गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा मुद्दा बनविला होता. शुद्ध पिण्याचे पाणी, शिक्षण आरोग्य आणि नागरी सुविधा गावकऱ्यांपर्यंत पोहोचतच का नाहीत ? या विचारातून या मुलीने थेट निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.

शाळेत शकडो विद्यार्थी-विद्यार्थींना असताना सगळ्यात मिळून एकच कॉमन टॉयलेट का? विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार ते का नाहीत? परदेशात असतात तसे आपल्या शाळेत किंवा काही विशिष्ट ठिकाणी सेनेटरीपॅडचे व्हेंडिंग मशीन्स आपल्या गावखेड्यात का नाहीत? असे प्रश्न घेवून निवडणुकीचा प्रचार केला.  परदेशात पाहिला तसाच समाज माझ्या गावात बनला पाहिजे, हे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून निवडणूक लढवली. तसे विकासाचे मॉडेल गावागावात विकसित व्हायला पाहिजे, या मुद्द्यावर त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यामध्ये बाजी देखील मारली. त्यांनी त्यांच्या सरपंचपदाच्या निवडणुकीसह त्यांच्या सर्व पॅनलचे सदस्य देखील निवडून आणले असून विरोधकांचा सुपडासाफ केला आहे.

परदेशातील वैद्यकीय शिक्षणाचा उपयोग आपल्या मातीतील लोकांसाठी करून समाजसेवा करण्याचा मानस होता. परंतु वैद्यकीय क्षेत्र ऐवजी समाजकारणातून समाजसेवा अधिक लवकर प्रमाणात करता येईल, या मानसिकतेतून राजकारणाकडे वळली. थेट सरपंच झाल्याने लोकांना अधिक प्रमाणात मदत करण्यात येणार आहे. समाजसेवेबरोबरच वैद्यकीय सेवेतून देखील गावातील लोकांना जास्तीत जास्त मदत करण्याचाच माझा प्रयत्न राहील.
– यशोधरा शिंदे – नूतन सरपंच.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT