Latest

Sangali News : बाज येथे दोन लाखाचा गांजा जप्त

Sonali Jadhav

जत, पुढारी वृत्तसेवा : बाज (ता.जत) येथे ऊसात लागवड केलेल्या गांजा शेतीवर छापा टाकून सुमारे १९ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांजाची किंमत १ लाख ९१ हजार इतकी होत आहे.  छापा सोमवारी (दि.४) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास टाकण्यात आला होता. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घुगे, पोलीस नाईक, सुनील व्हनखडे, विजय अकुल यांनी केली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी बापू पांडुरंग खरात (वय५२ ) यास अटक करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत जत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Sangali : १९ किलो गांजा जप्त

याबाबत अधिक माहिती अशी की, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांना बाज येथे गट नंबर ६७२ येथील ऊस शेतात गांजा लागवड केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार साळुंखे यांनी पोलीस उपनिरीक्षक घुगे, पोलीस नाईक सुनील व्हनखंडे यांना छापा टाकण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने छापा टाकून रात्री उशिरा १९ किलो गांजा जप्त केला आहे. संशयित आरोपी खरात यास ताब्यात घेतले आहे. बाजार भावाप्रमाणे या गांजाची १लाख ९१ हजार इतकी किंमत होत आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस कार्यालय करत आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT