Latest

सांगलीत केबल वॉर पुन्हा भडकले

backup backup

सांगली पुढारी वृत्तसेवा: सांगलीमध्ये (Sangali) केबल वॉर पुन्हा भडकत असल्याचे दिसते आहे. एका खासगी इंटरनेट कंपनीची वायर कट करणार्‍या तरुणांना रोखण्यावरून दोन गटात जोरदार वादावादी झाली. यातून आठ जणांनी तिघांना बेदम मारहाण केली. त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला, अशी तक्रार शुभम चंद्रकांत खरमाटे याने सोमवारी दिली होती.

आज विरोधी गटातील निकेश दिनकर मदने (रा. कसबे डिग्रज) याने कोयता आणि स्टीकने मारल्याची तक्रार विश्रामबाग पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार शुभम खरमाटे, प्रदोत बाळासाहेब पवार, प्रवीण हिंदुराव पाटील, शुभम सूर्यवंशी व इतर तिघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हॉकी स्टीकने मारहाण करुन ठार मारण्याचा प्रयत्न

मदने याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, आम्ही सोमवारी रात्री सांगली मीडिया कम्युनिकेशनने आम्हाला नेमून दिलेले केबल वायर सुरक्षेचे काम करीत होतो. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास काँग्रेस भवन ते शिवाजी स्टेडियमकडे जाणार्‍या रस्त्यावर आम्हाला "सांगली मीडिया कम्युनिकेशनमध्ये काम करू नका", असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. हॉकी स्टीकने मारहाण करून दुचाकी भरधाव वेगाने अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. त्यात विवेकानंद उर्फ बैजू आणि गणेश हत्तीकर यांना जखमी केले. त्यांच्या डोक्यावर कोयत्याने व तोंडावर हॉकी स्टीकने मारहाण करुन ठार मारण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT