नाशिक; पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातील रहिवासी असलेल्या संदीप अर्जुन शिंदे या लष्करी जवानाने जम्मू-काश्मीरमध्ये सेवेत असताना स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या (जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या) केली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
उत्तर काश्मीर मधील कुपवाडा जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. येथील द्रांग्यारी चौकीबाल येथे सेवेवर असणाऱ्या संदीप अर्जुन शिंदे बीसी भारतीय जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या (जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या) केली आहे. संबंधित जवानाने सोमवारी (दि.१३) रोजी पहाटेच्या सुमारास स्वत:च्या सर्व्हिस रायफलमधून गोळी झाडून आयुष्याचा शेवट केला आहे.
गोळी झाडल्यानंतर जखमी अवस्थेतील संदीप शिंदे यांना काही जवानांनी तातडीने श्रीनगर येथील लष्करी रुग्णालयात उपचारासाठी हलविले. पंरतु, मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्त्राव झाल्याने संदीपचा वाटेतच मृत्यू झाला आहे.
जवान संदीप शिंदे यांनी नेमके कोणत्या कारणावरून आत्महत्या केली आहे?, याची कोणती देखील माहिती अद्याप समोर आलेली नाही.
हेही वाचलंत का?
पाहा व्हिडिओ : प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळतंच : विश्वास नांगरे -पाटील