Latest

Samir Shah BBC | अभिमानास्पद! ब्रिटन PM नंतर, BBC अध्यक्षपदी भारतीय वंशाचे ‘समीर शहा’

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा कारभार सध्या भारतीय वंशाचे ऋषी सुनक चालवत आहेत. यानंतर ब्रिटन सरकारने BBC च्या अध्यक्षपदी आणखी एका भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड झाली आहे. त्यांचे नाव समीर शहा असे असून, त्यांचा जन्म महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये झाला आहे. ही गोष्ट भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. (Samir Shah BBC)

भारतीय वंशाचे पत्रकार समीर शहा यांना बीबीसीमध्ये रिचर्ड शॉर्प यांच्या जागी नियुक्त केले आहे. रिचर्ड शॉर्प यांना एप्रिल २०२३ मध्ये या पदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर बीबीसीने आर्थिक संकटातून जात असतानाच मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कंपनीने सगळी सुत्रे भारतीय वंशाच्या समीर शहा यांच्याकडे सोपवली आहेत. (Samir Shah BBC)

भारतीय वंशाचे पत्रकार समीर शहा हे गेल्या ४० वर्षांपासून टेलिव्हिजन न्यूज इंडस्ट्रीत काम करत आहेत. त्यांनी यापूर्वी बीबीसीत चालू घडामोडी आणि राजकीय कार्यक्रमाच्या न्यूजची जबाबदारी पार पाडली आहे. यापूर्वी त्यांनी अनेकवेळा सरकारचा उमेदवार म्हणून नियुक्त केल्यास काम करायला आवडेल, असे म्हटले होते. दरम्यान, ब्रिटीश संसदीय समितीकडून त्यांच्या नियुक्तीला अनोमोदन देण्यात आले. त्यानंतर बीबीसी सरकारने बीबीसीच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे पत्रकार समीर शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Samir Shah BBC)

Samir Shah BBC : बीबीसी विषयी थोडक्यात…

ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC) ही जगातील सर्वात मोठी माहिती प्रसारण संस्था आहे. तसेच बीबीसी हे जगातील विविध देशांमधील बातम्यांचे कार्यक्रम प्रसारित करणार्‍या सर्वात मोठ्या टेलिव्हिजन नेटवर्कपैकी एक आहे. केवळ इंग्लंडमध्ये या संस्थेचे सुमारे २८, ५०० कर्मचारी आहेत. तर कंपनीची वार्षिक आर्थिक उलाढाल सुमारे ८०० कोटी डॉलर इतकी आहे. बीबीसी ही पहिली राष्ट्रीय माहिती प्रसारण संस्था आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT