Latest

Bigg Boss OTT Season 2 : सलमान खानची डबल डेकर बसवरून एन्ट्री

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस ओटीटी सीझन २ जिओसिनेमावर १७ जूनपासून धमाक्‍यात सुरू होण्‍यास सज्‍ज आहे. (Bigg Boss OTT Season 2 ) प्रीमियरपूर्वी बॉलिवूडचा सुपरस्‍टार सलमान खानने बिग बॉस ओटीटी सेट्सवर धमाकेदार एन्ट्री करत धूमाकू‍ळ घातला. दबंग-अभिनेता डबल-डेकर बसच्‍या छतावर उभे राहून त्याने एन्ट्री केली. या शोचे उत्‍साहवर्धक गाणे 'लागी बागी'वर नृत्‍य करताना तो दिसला. तसेच फोटोग्राफर्ससाठी अद्वितीय मोहकता व स्‍वॅगसह पोझ देताना दिसला. (Bigg Boss OTT Season 2 )

बिग बॉस ओटीटी सीझन २ अनेक ट्विस्‍ट्सच्‍या सादरीकरण होणार आहे. सलमान खान म्हणाला, "मी ओटीटीवरदेखील असा कोणताही कंटेंट देणार नाही, जो संस्कृती विरोधात असेल.

सलमानने या वर्षाच्या सुरुवातीला ओटीटीविषयी म्हटलं होतं की, मला वास्तवात वाटतं की, ओटीटीवर सेंसरशिप असायला हवी. अश्लीलता, शिव्या, असभ्य वर्तणूक सर्व काही बंद व्हायला हवं. १५-१६ वर्षांचा मुलगादेखील बिग बॉस पाहू शकेल.

बिग बॉस ओटीटी सीजन २ हा शो १७ जून पासून जियो सिनेमावर स्ट्रीम होणार आहे. या शोचा पहिला सीझन करण जोहरने होस्ट केला आहे. बिग बॉस हाऊसची झलकदेखील समोर आली आहे. यावेळची थीम 'स्ट्रेंज हाऊस' आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT