Latest

करण जाेहरच्‍या बर्थ डे पार्टीत सलमान-ऐश्वर्या आले समोरासमोर, अभिषेकने असं काही केलं की…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने ५०वा वाढदिवसानिमित्त  एका खास पार्टीचे आयोजन करण्‍यात आले होतं. या पार्टीला बॉलिवूड ते हॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली; परंतु या पार्टीत काही असे स्टार्स होत की ज्यांची भेट खूप वर्षांनी  हाेत हाेती. यात ऐश्वर्या रॉय बच्चन, अभिषेक बच्चन, कॅटरिना कैफ आणि सलमान खान होते.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय, कॅटरिना कैफ, सलमान खान, अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, प्रिती झिंटा हे कलाकार अनेक वर्षांनंतर एकाच पार्टीत दिसले. मात्र, या पार्टीत सर्वांच्या नजरा कॅटरिना कैफ आणि ऐश्वर्या रॉय यांच्यावर खिळल्या.

सलमान त्याच्या अंगरक्षकासोबत एकटाच पार्टीला पोहोचला होता. तर ऐश्वर्या आणि कॅटरिना आपापल्या पती अभिषेक बच्चन आणि विकी कौशलसोबत पोहोचल्या होत्या.  सलमान आणि ऐश्वर्या रॉय समोरासमोर आले. या वेळी ऐश्वर्या थोडी बाजूला सरकली तर अभिषेक बच्चन याने थेट सलमानला मिट्टीच मारली. यावरुन या दाेघांमधील मैत्रीचे नाते आजही कायम असल्‍याचे दिसले.

सलमान आणि ऐश्वर्या रॉय २-३ वर्षे एकमेकांना डेट करत होते; परंतु २००२ मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. यानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक यांचे लग्‍न झाले. यानंतर सलमानचे नाव कॅटरिनाबराेबर जाेडले गेले. त्याचंही नातं फार काळ टिकलं नाही. यामुळेच करण जाेहरच्‍या बर्थ डे पार्टीत ऐश्वर्या आणि कॅटरिना सलमानला पाहताच काही अंतर दूर राहिल्या.

करण जोहरच्या पार्टीत बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि सीमा सजदेह देखील दिसल्या. सलमानच्या बहिणी अलविरा आणि अर्पिता खान शर्मादेखील पोहोचल्या होत्या. या पार्टीला  शाहरूख खान याने धमाकेदार डान्स केला.

हेही वाचलंत का? 

(video, photo: viralbhayani instgram वरून साभार)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT