Latest

Salman bday bash : आधी मिठी मग चुंबन, सलमान-एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीचा व्हिडिओ व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आज २७ डिसेंबर रोजी ५७ वा वाढदिवस आहे. काल रात्री त्याने बॉलिवूड स्टार्ससोबत वाढदिवस साजरा केला. (Salman bday bash) यावेळचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळताहेत. या बर्थडे पार्टीला अनेक बॉलिवूड स्टार्सनी पोहोचून चार चाँद लावले. विशेष म्हणजे, पार्टीत त्याची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीनेदेखील हजेरी लावली. या पार्टीमध्ये सर्वांच्या नजरा संगीताकडे वळल्या होत्या. दोघांचा एक प्रसंग कॅमेेराबद्ध झाला. आता ससोशलम मीडियावर सलमान आणि संगीताचे व्हिडिओ चांगलेच चर्चेत आले आहेत. (Salman bday bash)

वाढदिवसाच्या पार्टीत सलमानसोबत संगीता बिजलानी दिसली. विशेष म्हणजे, दोघे गप्पा मारत होते आणि त्याचवेळी सलमानने संगीता बिजलानीची आधी गळाभेट घेतली आणि नंतर कपाळावर चुंबन घेतलं. हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला.

अभिनेत्री संगीता बिजलानी ही सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड आहे. संगीतासोबतचे सलमानचे प्रेमाचे किस्से सर्वश्रृत आहेत. पण, त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. लॉन्गटाईमनंतर दोघांना एकमेकांसोबत पाहून सर्वांच्याच भूवया उंचावल्या. दोघांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

यामध्ये दिसते की, संगीता बर्थडे पार्टीनंतर घरी परतत असताना सलमान स्वत: तिला गाडीपर्यंत सोडण्यासाठी येतो. ती यावेळी निळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसते. संगीता बिजलानीची कार पुढे येताच सलमान तिची गळाभेट घेतो आणि नंतर संगीताच्या कपाळावर चुंबन घेत घेतो. या व्हिडिओमध्ये सलमान खानचे संगीतावरचे प्रेम स्पष्टपणे पाहायला मिळते.

आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पूर आला आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, 'पहिले प्रेम हे शेवटचे प्रेम आहे'. तर दुसऱ्या युजरने व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करत 'तू पहला पहला प्यार है मेरा' असे लिहिले आहे. सलमान खानचे कौतुक करताना एका युजरने लिहिले की, 'भाई है ही ऐसे जो उनकी जिंदगी में आता है सभी से प्यार करते हैं'.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT