पुढारी ऑनलाईन डेस्क : सॅफ चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत चार संघ पोहोचले आहेत. स्पर्धेत 'अ' गटातून कुवेत आणि भारत यांनी तर तर, लेबनॉन आणि बांगलादेशच्या संघांनी 'ब' गटातून उपांत्य फेरी गाठली आहे. (SAFF Championship)
उपांत्य फेरीच्या चार लढतींमध्ये कुवेतचा सामना बांगलादेशशी तर, लेबनॉनचा सामना भारताशी होणार आहे. दोन्ही उपांत्य फेरीचे सामने १ जुलै रोजी होणार आहेत. कुवेत-बांगलादेश सामना दुपारी ३ वाजता खेळवण्यात येणार आहे तर, भारत-लेबनॉन सामना संध्याकाळी ७.३० वाजता होणार आहे. (SAFF Championship)
नुकत्याच झालेल्या इंटरकॉन्टिनेंटल चषकाच्या अंतिम फेरीत भारताने लेबनॉनचा पराभव करून ट्रॉफी जिंकली होती. आतापर्यंत दोन्ही संघ आठ वेळा आमनेसामने आले आहेत. याबाबतीत लेबनॉनचे पारडे जड आहे. आमने-सामनेच्या लढाईत भारताने दोन आणि लेबनॉनने तीन सामने जिंकले आहेत.
लेबनॉनने बुधवारी 'ब' गटातील शेवटच्या सामन्यात मालदीवचा १-० असा पराभव केला. संघासाठी कर्णधार हसन माटूकने २४व्या मिनिटाला फ्री-किकवर महत्त्वपूर्ण गोल केला. लेबनॉनने ग्रुप स्टेजमधील तिन्ही सामने जिंकत ग्रुपमधील अव्वल स्थान पटकावले. यासोबतच भारतीय संघाने 'अ' गटातील तीनपैकी दोन सामने जिंकले. भारतीय संघाने पाकिस्तानचा ४-० आणि नेपाळचा २-० अशा गोल फरकाने पराभव केला. कुवेतविरुद्धचा शेवटचा गट सामना १-१ असा बरोबरीत सुटला.
नुकत्याच झालेल्या इंटरकॉन्टिनेंटल चषकाच्या अंतिम फेरीत भारताने लेबनॉनचा पराभव करून ट्रॉफी जिंकली होती. आतापर्यंत दोन्ही संघ आठ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी भारताने दोन आणि लेबनॉनने तीन सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर तीन सामने अनिर्णित राहिले आहेत.
सामनाच्या निकाल ९० मिनिटांपर्यंत अनिर्णित राहिल्यास सामना ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत जाईल. तोही दोन हाफमध्ये खेळला जाईल. त्याचबरोबर अतिरिक्त वेळेतही बरोबरी राहिल्यास सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये खेळवण्यात येईल.
दोन्ही संघांच्या फिफा रँकिंगबद्दल बोलायचे झाल्यास, लेबनॉन ९९ व्या स्थानावर आहे तर भारताचे फिफा रँकिंग १०० आहे. दोन्ही संघांच्या शेवटच्या पाच सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, भारताने त्यांच्या मागील पाच सामन्यांपैकी तीन जिंकले आहेत, तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. त्याचबरोबर लेबनॉनने मागील पाचपैकी तीन सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला, तर एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
हेही वाचा;