पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोना प्रतिबंधक लस स्पुतनिक व्ही निर्मिती पथकातील रशियन शास्त्रज्ञ आंद्रे बोटीकोव्ह यांचा गळा दाबून खून झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे, अशी माहिती आज ( दि. ४ ) रशियातील माध्यमांनी दिली. ( Russian scientist )
रशियातील वृत्तसंस्था TASS ने रशियन फेडरेशनच्या तपास समितीच्या हवाल्याने म्हटले आहे की, "शास्त्रज्ञ आंद्रे बोटीकोव्ह यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत गुरुवारी त्यांच्या घरात आढळला. त्यांनी नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इकोलॉजी अँड मॅथेमॅटिक्स येथे वरिष्ठ संशोधक म्हणून काम केले होते. बोटीकोव्ह यांचा मृतदेह सापडल्यानंतर काही तासांमध्येच या प्रकरणातील संशयिताला अटक करण्यात आली आहे."
२९ वर्षीय संशयित आरोपीने बेल्टने गळा दाबून बोटीकोव्ह यांचा खून केला. हल्लेखोराने आपला गुन्हा कबुल केला आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. हा प्रकार पूर्ववैमन्स्यातून घडला असावा, असा प्राथमिक अंदाज तपास संस्थांनी व्यक्त केला आहे.
२०२१ मध्ये कोरोना प्रतिबंधक लस स्पुतनिक व्ही निर्मितीमध्ये योगदान दिल्याबद्दल आंद्रे बोटीकोव्ह यांचा 'ऑर्डर ऑफ मेरिट ऑर द फादरलँड पुरस्कारा'ने सन्मान करण्यात आला होता. लस निर्मिती करणार्या पथकांमधील १८ शास्त्रज्ञांपैकी आंद्रे बोटीकोव्ह एक होते.
हेही वाचा :