पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेनच्या लुहांस्क, दोनेत्स्क, खेरसान आणि जापोरिझिझिया या भागांवर रशियाने कब्जा केला होता. या भागातील रहिवाशांनी रशियात समावेश व्हावा यासाठी पाठींबा दिला, असल्याचे रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. युक्रेनमधील कब्जा केलेल्या क्षेत्राचा रशियात समावेश केल्याची घोषणा आज, शुक्रवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी केली. तर या चार क्षेत्रांतील लोकांचे मतदान घेताना रशियाने आंतरराष्ट्रीय कायदे मोडले असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. (Russia VS Ukraine)
रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काबीज केलेल्या या क्षेत्रातील लोकांना संबोधित केले. पुतीन यांनी युक्रेनच्या सीमा तोडण्याची घोषणा केली आहे. याबाबत बोलताना पुतीन म्हणाले की, कालच रशियन संसदेत क्रेमलिन यांनी म्हटले होते की, जनमत चाचणी नंतर शुक्रवारी युक्रेनच्या चार क्षेत्रांचा रशियात समावेश केला जाईल. व्लादिमीर पुतीन यांच्या प्रवक्त्याने यावेळी माहिती देताना सांगितले की, काल ग्रांड क्रेमलिन पॅलेसच्या जॉर्जियन हॉलमध्ये याबाबत स्वाक्षऱ्या करण्याचे आयोजन करण्यात येईल. तसेच रशियन नेते यावेळी महत्वपूर्ण भाषणही करतील. (Russia VS Ukraine)