Latest

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धविराम लवकरच?, पुतिन यांचे संकेत!

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Russia Ukraine War : कोरोनाच्या संकटातून जग सावरतो न सावरतो तोच या वर्षाच्या सुरुवातीला 24 फेब्रुवारी 2022 ला रशियाने युक्रेनवर आक्रमण केले. तेव्हापासून हे युद्ध अद्याप सुरू आहे. जवळपास 300 दिवस या युद्धाला पूर्ण होत आहे. या युद्धामुळे जगावर आर्थिक मंदीचे सावट आणखी गडद झाले. त्यामुळे हे युद्ध कधी संपते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 'हे युद्ध जितक्या लवकर संपेल तितके चांगले आहे', असे वक्तव्य केले आहे. मात्र, आदल्या दिवशीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी आम्ही शरणागती स्वीकारणार नाही. अशा परिस्थितीत वर्षाचा शेवट युद्ध विरामाने होईल का नवीन वर्षाची सुरुवातदेखील युद्धाने होईल, याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे.

Russia Ukraine War : रशियाचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर पुतीन यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की रशिया युक्रेन सोबतचा संघर्ष लवकरात लवकर संपवू इच्छितो. हे युद्ध लवकरात लवकर संपायला हवे. असे म्हटले आहे. आमचे लक्ष्य या संघर्षाला संपवणे आहे. आम्ही यासाठी प्रयत्न करत आहोत. तसेच युद्ध विरामाच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत राहू. आम्ही हे सुनिश्चित करण्याचे प्रयत्न करू की हे सर्व लवकरात लवकर थांबवावे. हा संघर्ष जितक्या लवकर संपेल तितके उत्तम, असे पुतिन यांनी म्हटले आहे.

Russia Ukraine War : तर दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नुकत्याच केलेल्या अमेरिका दौऱ्यात आम्ही कदापि शरणागती पत्करणार नाही. असे स्पष्ट केले आहे, अमेरिका दौऱ्यात झेलेन्सकी म्हणाले की, आम्ही ठाम आहोत, पाय रोवून उभे आहोत, आम्ही कदापि शरणागती पत्करणार नाही, असे सांगत झेलेन्स्की यांनी अमेरिकेने केलेली मदत ही देणगी नसून ती लोकशाहीमध्ये केलेली गुंतवणूक आहे, अशा शब्दांत अमेरिकेचे आभार मानले.

Russia Ukraine War : त्यामुळे एकीकडे पुतिन यांनी युद्ध लवकरात लवकर संपायला हवे असे म्हणत युद्धविरामाचे संकेत दिले आहेत का? तर युक्रेनच्या ठाम भूमिकेमुळे युद्ध सुरूच राहील याकडे आता अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT