Latest

Russia Ukraine War : रशियाच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात युक्रेनमध्ये ११ ठार

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेले काही महिने रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु आहे. पुन्हा एकदा रशियाने युक्रेनवर गुरुवारी (दि.२६) हल्ला केला. या क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या हल्ल्यात (Russia Ukraine War) युक्रेनच्या ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ११ लोक जखमी झाले आहेत. जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनला रणगाडे पाठवण्याची घोषणा केल्यानंतर रशियाने गुरुवारी संपूर्ण युक्रेनवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ला केला. या हल्यानंतर अमोेरिकेने रशियावर टीका केली आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी नियमित निवेदनाता युक्रेनवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आणि सर्व जखमींबद्दल सहानुभूती व्यक्त केली.

Russia Ukraine War : ११ लोकांचा मृत्यू 

जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनला रणगाडे पाठवण्याची घोषणा केली. त्याच्या दुसऱ्या दिवशी (दि.२६, गुरुवार) रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा हल्ला केला. हा हल्ला इतका मोठा होता की युक्रेनच्या ११ लोकांचा मृत्यू झाला आहे तर ११ लोक जखमी झाले आहेत. जखमींवर तात्काळ उपचार सुरु आहेत. युक्रेनच्या ११ प्रादेशिक भागातील ३५ इमारतींचे नुकसान झाले आहे. तर दोन ठिकाणी आग लागली आहे.  युक्रेनचे आपत्कालीन सेवेचे प्रवक्ते ऑलेक्जेडर खोरुन्झी यांनी केलेल्या दाव्यानुसार कीव्ह शहराच्या क्षेत्रात अधिक नुकसान झाले आहे. पुढे त्यांनी असही म्हंटलं आहे की, बचावकार्यात युक्रेनचे १०० सैनिक आहेत. ते पुढे असेही असे म्हणाले की, लोक आपापल्या कामावर जात होते, दरम्यान युक्रेनमध्ये हवाई हल्ल्याचे इशारे वाजू लागले. त्यानंतर राजधानीतील भूमिगत मेट्रो स्थानकांवर काही काळ गर्दी जमली होती.

झेलेन्स्की यांचा क्षेपणास्त्रे आणि ड्रोन पाडल्याचा दावा 

युक्रेनने म्हटले आहे की त्यांनी रात्रभर रशियाने पाठवलेले सर्व २४ ड्रोन पाडले गेले आहेत. ज्यात त्यापैकी १५ राजधानी कीव्हच्या आसपास पाडण्यात आले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अतिरेकी राज्याने आम्हाला मोठ्या क्षेपणास्त्र हल्ल्याने धमकावण्याचा आणखी एक प्रयत्न फसला आहे,  लवकरच रशियाचा पराभव होईल.

या हल्यात आपलं घर गमावलेल्या ६७ वर्षीय हलिना पानोसियन सांगतात, " माझ्याकडे काहीच नाही आहे. घऱाची एकही खोली शिल्लक राहिलेली नाही. सर्व जमिनदोस्त झाले आहे. हल्ला झाला त्या दिवशी अचानक मोठा आवाज आला. आणि एक धक्का बसला. त्यावेळी मी माझ्या रुममध्ये होते. मी वाचले कारण घराच्या दुसऱ्या बाजुला ती खोली होती.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT