मास्को : पुढारी ऑनलाईन डेस्क
रशिया – युक्रेनमधील युद्ध आता निर्णयाक वळणावर येवून ठेपले आहे. युद्धाच्या सहाव्या दिवशीही रशियाकडून मोठ्या प्रमाणावर बॉम्बहल्ले करण्यात आले. याला युक्रेनहीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अशातच रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने युद्धाबाबत मोठे विधान केले आहे.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे की, आता आम्ही आमचे उद्दिष्ट्य साध्य होईपर्यंत युक्रेनवर हल्ले करतच राहणार आहे. तर रशियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, अमेरिकेने सर्वप्रथम युरोपमधील अणवस्त्र नष्ट करावीत. आम्ही आता आमचे उद्दिष्ट्य साध्य केल्याशिवाय थांबणार नाही. रशियाने युद्धाबाबत आपली भूमिका स्पष्ट केल्याने आता जगावरील चिंतेचे ढग अधिक गडद झाले आहेत.
युध्दाच्या पाचव्या दिवशी ( दि. २८ फेब्रुवारी) रशियाने रॉकेटसह क्रुझ क्षेपणास्त्रांच्या केलेल्या मार्यामुळे युक्रेनमध्ये हाहाकार माजला आहे. ( Russia-Ukraine War News ) राजधानी कीव्ह शहराच्या दिशेने रशियन सैन्याची आगेकूच करत केवळ ६४ किलोमीटर अंतरावर याने व्यापल्याचे सॅटेलाईट फोटोमधून स्पष्ट झाले आहे. खार्किव्ह आणि कीव्हा या दोन शहरांमध्ये असलेल्या युक्रेनच्या लष्करी छावणीवर रशियाने हल्ला केला. यामध्ये ७० हून अधिक युक्रेनच्या सैनिक ठार झाले आहेत. दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या आपत्तकालीन बैठकीत प्रतिवादी पक्षाला २९ मते पडली. या मतदानात भारतासह अन्य १३ देशांनी भाग घेतला नाही.
वृत्तसंस्था रायटर्सने दिलेल्या माहितीनुसार, युध्दाचा पाचव्या दिवशी युक्रेनचे मोठे नुकसान झाले. आतापर्यंत रशियाने ५६ रॉकेटसह ११३ क्रुझ क्षेपणास्त्र युक्रेनवर डागली आहेत, अशी माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की यांनी दिली.
कीव्हमध्ये रशियन सैन्याची आगेकूच राजधानी कीव्ह शहराच्या दिशेने रशियन सैन्याची आगेकूच करत केवळ ६४ किलोमीटर अंतरावर याने व्यापल्याचे सॅटेलाईट फोटोमधून स्पष्ट झाले आहे. कीव्हमधील नागरिकांनी शहर सोडावे, असे आवाहन सोमवारी रशियन सैन्याने केले होते. दरम्यान, जर्मनीसह अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांनी युक्रेनला लष्करी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचलं का?