Latest

दोन हजारांच्‍या ‘नोटबंदी’मुळे फायदाच! जाणून घ्‍या ‘एसबीआय रिसर्च’ अहवाल काय सांगतो?

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विविध आर्थिक बाबींना चालना मिळेल, असा विश्‍वास  SBI रिसर्चने आपल्या ताज्या Ecowrap अहवालात व्‍यक्‍त केले आहे.  जाणून घेवूया या अहवालातील माहिती. ( SBI Research report)

'आरबीआय'ने १९ मे २०२३ रोजी 2000 रुपयांच्‍या मूल्याच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला होता; परंतु त्या कायदेशीर निविदा म्हणून कायम राहतील, असेही स्‍पष्‍ट केले होते. आरबीआय कायदा, १९३४ च्या कलम २४(१) अंतर्गत २०१६ मध्‍ये 2000 रुपयांची नोट बँकेकडून सादर करण्यात आली होती. इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर 2000 रुपयांच्या नोटा बाजारात आणण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले. त्यामुळे २०१८-१९ मध्ये 2000रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती.

आतापर्यंत 2000 रुपयांच्या सुमारे 180,000 कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या आहेत. ३१ मार्च रोजी चलनात आलेल्या 2000 रुपयांच्या नोटांपैकी हे अंदाजे 50 टक्के आहे, असे आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले होते.

SBI Research report : एकूणच आर्थिक व्‍यवहारात होणार वाढ

SBI रिसर्चने आपल्या ताज्या Ecowrap अहवालात म्‍हटले आहे की, 2000 रुपयांच्या नोटा काढून घेतल्याने बँकेतील ठेवी, कर्जाची परतफेड, आरबीआयचा किरकोळ डिजिटल चलन वापर आणि एकूणच आर्थिक व्‍यवहार वाढू शकतात. सध्याच्या ट्रेंडनुसार CASA ठेवी वाढण्याची शक्यता आहे, असेही या अहवालात नमूद केले आहे.

SBI Research report : ठेवींमध्‍ये ३.३ लाख कोटी रुपयांची वाढ

ऑल शेड्यूल्ड कमर्शियल बँक (एएससीबी) डेटाचा हवाला देऊन SBI रिसर्चने आपल्या ताज्या Ecowrap अहवालात म्हटले आहे की, 2 जून 2023 रोजी संपलेल्या पंधरवड्यात बँकांच्‍या ठेवीत एकूण 3.3 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मागील दोन वर्षात याच पंधरवड्यात ठेवींमध्ये सरासरी वाढ झाली होती सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांची. या पंधरवड्यात बँकांमध्‍ये सुमारे 1.8 लाख कोटी रुपयांच्या अतिरिक्त ठेवी जमा हाेतील, असेही या अहवालात म्‍हटले आहे.

३० टक्के ठेवी कर्ज परतफेड वापरली जावू शकते

एसबीआय रिसर्चच्या मूल्यांकनानुसार, ग्राहकांकडे असणार्‍या दोन हजार रुपयांच्‍या ३० टक्के ठेवी (किंवा 92,000 कोटी रुपये) कर्जाची परतफेड करण्‍यासाठी वापरली जावू शकते. त्‍यामुळे कर्ज परतफेडीचा वेग वाढेल. बँकांची पत चांगली राहणार आहे. रोख मूल्याचे व्यवहार, खरेदीसाठी कॅश ऑन डिलिव्हरी, मंदिरांमधील देणग्या आणि विविध प्रकारच्या खरेदीमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे, असेही या अहवालात नमूद केले आहे.

दरम्यान, लोक त्यांच्या 2,000 रुपयांच्या नोटा बँक शाखा आणि RBI च्या प्रादेशिक शाखांमध्ये बदलू किंवा जमा करू शकतात. खाते नसलेला व्यक्ती कोणत्याही बँकेच्या शाखेत एकावेळी 20,000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बदलू शकतो. आत्तापर्यंत, RBI ने स्‍पष्‍ट केले आहे की, नाेटा बदलून घेण्‍याची सुविधा 30 सप्टेंबर 2023 पर्यंत उपलब्ध असणार आहे. यानंतरही दाेन हजार रुपयांची नोटा कायदेशीर निविदा म्हणून सुरूच राहणार आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT