Latest

दाेन हजार रुपयांच्‍या नाेटा ‘बदली’संदर्भातील याचिका फेटाळली

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने २ हजार रूपयांच्या नोटासंदर्भात अधिसूचना जारी केल्या होत्या. ओळखपत्राशिवाय 2 हजार रुपयाची नोट बदलून देण्याच्या निर्णयाला (Rs 2000 Banknote Exchange) आव्हान देणारी याचिका आज (दि.२९) दिल्ली उच्च न्यायालयाने  फेटाळली.

बॅंकांमध्ये कोणत्याही ओळखपत्राशिवाय दोन हजार रुपयांची नोट बदलून देण्याची मुभा राहील,असे रिझर्व्ह बँक तसेच स्टेट बॅंकेने स्पष्ट केले हाेते. या निर्णयातील अधिसूचनेविरोधातील जनहित याचिका दिल्ली उच्च न्यालायात दाखल करण्यात आली होती.

Rs 2000 Banknote Exchange : ओळखपत्र सक्‍ती करण्‍याची हाेती मागणी

संबंधित याचिकेत दोन हजाराची नोट ज्याच्याकडे आहे, त्यानेच ती बॅंकेत जमा (Rs 2000 Banknote Exchange) करावी. तपशील व ओळखपत्र नसेल तर कोणीही कोणाच्याही खात्यात ही रक्कम जमा करु शकते. याद्वारे काळा पैसा पांढरा करु शकतो. त्यामुळे ओळखपत्र व तपशीलाशिवाय दोन हजारची नोट बॅंकेत जमा करण्यास मनाई करावी, अशी याचिकाकर्ते ॲड. अश्विनी उपाध्याय यांनी केली हाेती. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.

मागील आठवड्यात केंद्र सरकारने दोन हजार रुपयाच्या नोटेवर बंदी घातली होती. ३० सप्टेंबरपर्यंत बँकांमध्‍ये नोटा बदलून घेण्याची मुभा लोकांना देण्यात आली आहे. ओळखपत्र व तपशील असल्याशिवाय नोटा बदलून दिल्या जाणार नाहीत, अशी आधी चर्चा होती. मात्र वरील दोन्ही बाबींशिवाय नोटा बदलता येतील, असे आरबीआय आणि स्टेट बॅंकेने (Rs 2000 Banknote Exchange) स्पष्ट केलेले आहे. न्यायालयाने याचिका फेटाळल्यामुळे बँकांच्या अधिसूचना कायम राहणार आहेत.

हेही वाचा :
SCROLL FOR NEXT