पुढारी ऑनलाईन डेस्क : फुटबॉल विश्वचषकातून पोर्तुगाल बाहेर पडल्यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील ख्रिस्तियानो रोनाल्डोचे (Ronaldo Retirement) भवितव्य टांगणीला लागले आहे. उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात पोर्तुगालचा मोरोक्कोविरुद्धच्या सामन्यात पराभव झाला होता. मोरोक्कोने पोर्तुगालचा १-० अशा गोल फरकाने पराभव केला. रोनाल्डोला विश्वचषकाच्या बाद फेरीत पुन्हा एकदा गोल करण्यात यश आले नाही. संघाच्या पराभवामुळे रोनाल्डो आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होऊ शकतो अशा बातम्या आल्या होत्या, परंतु,रोनाल्डोने निवृत्तीबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार,आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या रोनाल्डोचा अद्याप निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार नाही. त्याला २०२४ मध्ये होणाऱ्या युरो कपमध्ये खेळायचे आहे. स्वताच्या नेतृत्वाखाली पोर्तुगालला दुसऱ्यांदा युरो विजेता बनवण्याचे त्याचे ध्येय आहे. त्याच्या फुटबॉल कारकिर्दीत तो फिफा विश्वचषक स्पर्धा जिंकू शकला नाही. रोनाल्डो पाच प्रयत्नांमध्ये अपयशी ठरला. २०२६ मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्याबद्दल त्याने अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. (Ronaldo Retirement)
वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर रोनाल्डोने प्रथम इंस्टाग्रामवर पोस्ट लिहिली. नंतर आता एक भावनिक कथा शेअर केली आहे. पोर्तुगालचा कर्णधार कथेत स्पष्ट करतो की वास्तविकतेच्या तीन बाजू आहेत: वेदना, अनिश्चितता आणि सतत काम. रोनाल्डोची कहाणी पाहिल्यानंतर हा स्टार खेळाडू आता थांबणार नाही आणि पुन्हा मैदानात परतेल, असा अंदाज चाहत्यांनी बांधला आहे.
रोनाल्डोने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टवर लिहिले की, "पोर्तुगालसाठी विश्वचषक जिंकणे हे माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठे आणि महत्त्वाकांक्षी स्वप्न होते. सुदैवाने, मी पोर्तुगालसाठी अनेक आंतरराष्ट्रीय विजेतेपदे जिंकली, पण माझ्या देशाला जगाच्या शीर्षस्थानी आणण्याचे माझे सर्वात मोठे स्वप्न होते. पण. मी ते पूर्ण करण्यासाठी त्यासाठी मी लढलो. या स्वप्नासाठी खूप संघर्ष केला. १६ वर्षांच्या विश्वचषकाच्या पाच आवृत्त्यांमध्ये, मी नेहमीच महान खेळाडूंसोबत आणि त्यांच्या पाठिंब्याने आणि लाखो पोर्तुगीजांच्या पाठिंब्याने खेळलो. संघासाठी मी मैदानावर माझे सर्वस्व अर्पण केले. मी नेहमीच लढलो आणि त्याच्यापासून मागे हटलो नाही. आपले स्वप्न कधीही सोडले नाही. मला माफ करा काल स्वप्न भंगले.
हेही वाचा;