Latest

Rohit Pawar मोठी बातमी: आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, ईडीने बजावले समन्स

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : एमएससी बँक मनी लॉड्रींग प्रकरणात राष्ट्रवादीच्या शरद पवारचे नेते आणि आमदार रोहित पवार यांना ईडीने समन्स बजावले आहे. काही दिवसांपूर्वी बारामती ॲग्रो कारखान्यावर ईडीने छापा टाकला होता. या कारवाईनंतर आता ईडीकडून रोहित पवार यांना मनी लॉड्रींग प्रकरणात  समन्स बजावले आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे. (Rohit Pawar)

महाराष्ट्र राज्य सहकारी (एमएससी) बँक घोटाळ्याप्रकरणी रोहित पवार यांना ईडीने २४ जानेवारीला ईडीसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. (Rohit Pawar)

आमदार रोहित पवार यांना आज (दि.१९) ED ने नोटीस जारी केली. बुधवारी २४ जानेवारी रोजी रोहित पवार यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. कन्नड कारखान्याच्या व्यवहाराबद्दल देखील रोहित यांच्यावर  ईडीचा संशय आहे. १५ दिवसांपूर्वीच बारामती ॲग्रोवर छापेमारी झाली होती. युवासंघर्ष यात्रेनंतर रोहित पवार ईडीच्या रडारवर होते. (Rohit Pawar)

यापूर्वी रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर 'ईडी'ची धाड

आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणेने ५ जानेवारीला धाड छापे टाकले. दरम्यान कंपनीच्या कार्यालयात अन्य लोकांना प्रवेश देणे बंद करण्यात आले होते. आमदार रोहित पवार यांची ही कंपनी आहे. अजित पवार हे राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पवार कुटुंबात उभी फूट पडली आहे. त्यानंतर आमदार रोहित पवार यांच्या कंपन्यांना सातत्याने केंद्रीय व राज्यातील यंत्रणांकडून टार्गेट केले जात आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT