Latest

सप्तशृंगी गडावरील घाटात रस्ता सुरक्षा वाढविणार; ‘हे’ आहे कारण

गणेश सोनवणे

सप्तशृंगगड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथे सप्तशृंगी निवासिनी देवीचा नवरात्रोत्सव 15 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. गडावर 15 दिवस उत्सव सुरू राहणार आहे. नवरात्रोत्सवाची नियोजन बैठक सप्तशृंग गडावर होऊन दहा किलोमीटर घाटात सुरक्षाच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे आदेश कळवण प्रकल्प सहायक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांनी दिले आहेत.

यात्रेच्या नियोजनासाठी विविध शासकीय-अशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व विश्वस्त संस्थेच्या विविध विभागांची बैठक नरवाडे यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत यात्रा नियोजन विविध विभाग व त्यांचे तालुका, जिल्हा व विभाग स्तरावरील विविध अधिकारी व कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ आदींनी तयारीबाबत चर्चा केली. तहसीलदारांनी सुविधांबाबत विविध सूचना दिल्या. तसेच शासकीय-निमशासकीय विभागातील पदाधिकाऱ्यांनी यात्रेसंदर्भात केलेल्या नियोजनाची माहिती तसेच संभाव्य सोयी सुविधांचा तपशील सादर केला. चौदसच्या दिवशी माता भगवतीच्या कीर्तिध्वजाचे विधिवत पूजन होऊन गवळी परिवारातील प्रतिनिधी भगवतीच्या पर्वत शिखरावर रात्री ध्वजारोहण करणार असल्याची माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली.

आढावा बैठकीला तहसीलदार वारूळे, कळवण पोलिस निरीक्षक, गटविकास अधिकारी नीलेश पाटील, विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली गायकवाड, वन परिमंडळ अधिकारी बागूल, पोलिस निरीक्षक भूपेंद्र टेंबेकर, पीएसआय बबन पाटोळे, पीएसआय लक्ष्मण कुलकर्णी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चिराग पवार , उपविभागीय रुग्णालय अधीक्षक डॉ. असिफ शेख, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी गो. वी. कासार, राज्य परिवहन विभागाचे वाहतूक अधीक्षक किरण भोसले, आगार व्यवस्थापक संदीप बेलदार, के. के. पवार, सार्वजनिक विभागाचे, राज्य विद्युत महामंडळाचे कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, प्रकाश पगार, राजू पवार, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, राजेश गवळी, ग्रामस्थ विजय दुबे, विजय बेनके आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT