Latest

‘इंडिया’ आघाडीला आणखी एक धक्‍का : ‘आरएलडी’ NDA मध्‍ये दाखल

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अखेर राष्‍ट्रीय लोक दलाचे (आरएलडी) प्रमुख जयंत चौधरी यांनी आज (दि.१२) आपला पक्ष भाजप नेतृत्त्‍वाखालील राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीमध्‍ये (एनडीए) सहभागी होत असल्‍याची घोषणा केली. भाजप विरोधी इंडिया आघाडीला हा आणखी एक धक्‍का मानला जात आहे. यामुळे पश्‍चिम उत्तर प्रदेशमध्‍ये आगामी लोकसभा निवटडणुकीतील समीकरणे बदलणार असल्‍याचे मानले जात आहे. ( RLD chief Jayant Chaudhary joining NDA )

माध्‍यमांशी बोलताना जयंत चौधरी म्‍हणाले की, एनडीए'मध्‍ये सहभागी होण्‍याबाबत मी माझ्या पक्षाच्या सर्व आमदार आणि कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे कोणतेही मोठे नियोजन नव्हते. आम्हाला अल्पावधीतच हा निर्णय घ्यावा लागला. परिस्थितीमुळे. आम्हाला लोकांसाठी काहीतरी चांगले करायचे आहे, असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.

केंद्र सरकारने जयंत चौधरी यांचे आजोबा, माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना देशातील सर्वोच्‍च नागरी सन्‍मान भारतरत्न पुरस्कार देण्याची नुकतीच घोषणा केली होती. यानंतर आज जयंत चाैधरी यांनी एनडीएमध्ये सामील होण्याची अधिकृत घोषणा केली. ते एनडीएमध्‍ये सहभागी हाेतील, अशी चर्चा मागील काही दिवस हाेत हाेती, याला आता पूर्णविराम मिळाला आहे.

जयंत चौधरी यांनी पोस्ट हटवण्यास दिला होता नकार

आजोबांना भारतरत्‍न पुरस्‍कार जाहीर झाल्‍यानंतर जयंत चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले होते. हा एक भावनिक आणि संस्मरणीय क्षण आहे. आज वडील अजित सिंह यांचे अधुरे स्वप्न पूर्ण झाल्याचे जयंत यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं होतं.  तसेच ही  पाेस्‍ट हटविणार नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले हाेते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT