Latest

Bairstow Runout : बेअरस्टो ‘आऊट’ वादात इंग्‍लंडच्‍या पंतप्रधानांची उडी; म्‍हणाले, “हे तर…”

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंग्‍लंड विरुद्‍ध ऑस्‍ट्रेलिया ॲशेस मालिकेतील दुसर्‍या कसोटी सामन्‍यात इंग्‍लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्‍टो याला ज्‍या पद्‍धतीने बाद केले यावरुन क्रिकेट जगतामध्‍ये दोन गट पडले आहे.  ( Bairstow Runout) याबाबत आजी-माजी क्रिकेटपटूंनी आपली मते माडली आहे. आता या वादात इंग्‍लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक उडी घेत ऑस्‍ट्रेलियाच्‍या खेळाडूंना टोला लगावला आहे.

ऋषी सुनक पत्रकार परिषदेत म्‍हणाले की, पंतप्रधान ऋषी सुनक यांनी बेन स्टोक्सच्या या घटनेबद्दलच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ते म्‍हणाले, " हे तर खिलाडूवृत्तीच्‍या विराेधात आहे. मला वाटतं  मी खेळाच्या भावनेचा विचार केला असता. मी अपील मागे घेतले असते. या प्रकाराबाबत  इंग्‍लंड क्रिकेट टीमचा कर्णधार बेन स्‍टोक्‍सने केलेले विधान बरोबर आहे.

या प्रकाराबाबत पंतप्रधान  ऋषी सुनक बेन स्टोक्स याच्‍या मताशी सहमत आहेत. ऑस्ट्रेलियाने ज्‍या खेळीने सामना जिंकला तसा सामना  जिंकू इच्छित नाही. त्यांची कृती खेळाच्या भावनेत नव्हती,"पंतप्रधानांच्या प्रवक्त्याने 'द गार्डियन'ला सांगितले. सामन्‍यानंतर  माध्‍यमांशी बोलताना स्‍टोक्‍स म्‍हणाला होता की, "हा प्रकार खेळाच्या भावनेच्या विरुद्ध आहे. आम्हाला ऑस्ट्रेलियासारखे सामने जिंकायचे नाहीत." स्‍टोक्‍सच्‍या मताशी मी सहमत असल्‍याचे  पंतप्रधान ऋषी सुनक यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

Bairstow Runout : सामन्‍यात नेमकं काय घडलं ?

ॲशेस मालिकेतील दुसर्‍या कसोटीच्‍या पाचव्या दिवशी इंग्लंडचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. कर्णधार बेन स्टोक्स आणि बेन डकेट यांच्‍या जोडीने जम बसवला. डकेट बाद झाल्यानंतर जॉनी बेयरस्टो आणि स्टोक्स यांनी भागीदारी सुरू केली, बेयरस्टोने ५२ व्या षटकातील शेवटचा चेंडू सोडला आणि स्टोक्सशी बोलण्यासाठी क्रीजच्या बाहेर आला. हे पाहून यष्टिरक्षक कॅरीने चेंडू यष्‍टीला फेकून मारला. नियमांनुसार, हा चेंडू डेड नव्हता आणि ऑस्ट्रेलियाच्या अपीलवर पंचाने बेअरस्टोला बाद घोषित केले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT