Latest

Rishabh Pant’s Accident : ऋषभ पंतला वाचवणाऱ्या बस चालकाने सांगितला अपघाताचा थरार; म्हणाला…

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत दिल्लीहून रुरकीला (उत्तराखंड) त्याच्या घरी आई- वडिलांना भेटायला जात असताना शुक्रवारी (दि.३०) पहाटे त्याच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात पंत गंभीर जखमी झाला आहे. डेहराडूनपासून सुमारे ९० किमी अंतरावर असलेल्या हरिद्वार जिल्ह्यातील नारसन येथे हा अपघात झाला. या अपघातानंतर हरिद्वारहून निघालेल्या बसचा चालक सुशील मान आणि बसमधल्या प्रवाश्यांनी ऋषभ पंतला कारमधून बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले व त्याला रुग्णालयात दाखल केले. ऋषभतच्या कारचा भीषण अपघात झाल्याचे सांगत त्यांनी या संपूर्ण घटनेचा थरार सांगितला. (Rishabh Pant's Accident)

ऋषभला वाचवणारे बस चालक सुशील मान यांनी सांगितले, आम्ही पहाटे ४.२५ मिनिटांनी हरिद्वार सोडले होते. अपघाताच्या घटनास्थळाच्या आधी मी माझ्या गाडीचा वेग कमी केला होता. सुमारे ३०० मीटर अंतरावर कारचा फोकस चमकत होता. ती कार आहे असे वाटत नव्हते. यावेळी मी आमच्या कंडक्टरला सांगतिले की पुढे अपघात झाला आहे. (Rishabh Pant's Accident)

मान म्हणाले, मी आमची बस थांबवून कंडक्टर व बसमधील काही प्रवास्यांसोबत अपघातग्रस्त कार जवळ पोहचलो. यावेळी कार मधून पंत बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होता. यावेळी मी आणि कंडक्टरने त्याला कारमधून बाहेर काढले. यावेळी मी पंतला म्हणालो तुम्ही कारमध्ये एकटेच आहात का? यावेळी पंतने हो असे उत्तर दिले आणि तो बेशुद्ध झाला. (Rishabh Pant's Accident)

सुशील मान पुढे म्हणाले, कारचा भीषण अपघात होऊन कारचा चक्काचूर झाला होता आणि कारच्या बोनेटला आग लागली होती. सर्वकाही आधीच संपले असते फक्त नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला. काही मिनिटांनी ऋषभ शुद्धीत आला. तो पर्यंत आम्ही त्याला वाहनापासून दूर एका दुभाजकावर बसवले होते. तेव्हा तो म्हणाला, मी ऋषभ पंत भारतीय क्रिकेटर. यानंतर त्याने पाणी मागितल्यावर आम्ही त्याला पाणी दिले. एका प्रवाशाने त्याच्यावर शॉल टाकून त्याला झाकले. तो पर्यंत मी फोन वरुन पोलिसांना माहिती देण्याचा प्रयत्न करत होतो. पण, पोलिसांशी संपर्क होत नव्हता.

दुसरीकडे ऋषभ पंतच्या संपूर्ण कारने पेट घेतला होता. तेव्हा आम्ही खूप घाबरलो होतो. माझ्या कंडक्टरने मला बसमधून ऋषभ पंतला रुग्णालायात घेऊन जाण्यास सांगितले. पण, तो पर्यंत पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचले होते. सुरुवातीला पंतला सक्षम या मल्टीस्पेशालिटी आणि ट्रॉम सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात हलविण्यात आले.

ऋषभ पंत अत्यंत वेगात कार चालवत होता. कार चालवत असताना पहाटे त्याला डुलकी लागली आणि त्याची गाडी तब्बल १०० मीटर रेलिंगला धडकून फरफटत गेल्याचा थरार बस चालक सुशील मान यांनी यावेळी माध्यमांना सांगितले.

हेही वाचंलत का?

SCROLL FOR NEXT