पुढारी ऑनलाईन डेस्क : सिटाडेल प्रमोशनसाठी रिचर्ड मॅडेन भारतात दाखल झाला. (Citadel ) त्याला रविवारी मुंबईतील एका खासगी विमानतळावर कॅज्युअल लूकमध्ये पाहण्यात आले. गेम ऑफ थ्रोन्स स्टारला पापराझींनी आपल्या कारकडे जाताना आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. त्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि ट्राउजर तसेच ट्रेंडी सनग्लासेस घातला होता. (Citadel )
रिचर्ड रूसो ब्रदर्सद्वारा दिग्दर्शित आगामी स्पाय वेब सीरीज सिटाडेलच्या प्रचारासाठी प्रियांका चोप्रासोबत तो सहभागी होणार आहे. तो सोमवार, ३ एप्रिल रोजी मुंबईमध्ये मीडियासोबत बातचीत करेल. प्रियांका काही दिवस आधी भारतात आलीय. ती मुंबईत ३१ मार्च आणि १ एप्रिल रोजी पति निक जोनास आणि मुलगी मालतीसोबत NMAAC उद्घाटनात दिसली होती.
सिटाडेलच्या भारतीय आवृत्तीत वरुण धवनसोबत सामंथा दिसेल. राज अँड डीके द्वारा दिग्दर्शित याचे शूटिंग सुरू झाले आहे.