Latest

Rice Price High : भारताच्या निर्यातबंदीनंतर जगभरात तांदळाच्या किमती भडकल्या; दराने गाठला १२ वर्षाचा उच्चांक

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Rice Price High : जगभरात गेल्या काही महिन्यांपासून तांदळाच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली असून तांदळाच्या दरांनी जवळपास १२ वर्षांतील सर्वोच्च पातळी गाठली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने जुलै महिन्यातील सर्व तांदूळ किंमत निर्देशांक दिले आहेत. त्यांच्या माहितीप्रमाणे जुलैमध्ये तांदळाचे दर २.८ टक्क्यांनी वाढून सरासरी १२९.७ अंकांवर पोहोचले आहेत. रॉयटर्सने याचा अहवाल दिला आहे. हे दर गेल्या वर्षीपेक्षा २० टक्क्यांनी जास्त आहेत. तसेच हे दर सप्टेंबर २०११ नंतरची सर्वोच्च पातळी आहे.

Rice Price High : भारताच्या निर्यातबंदीच्या निर्णयाचा मोठा परिणाम

तसे पाहता तांदळाच्या वाढत्या किमतीला अनेक घटक कारणीभूत आहे. मात्र भारताने गेल्या महिन्यात तांदूळ निर्यातीला आळा घालण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जागतिक बाजारात तांदळाच्या किमतीवर परिणाम होण्यासाठी भारत हा सर्वात जास्त महत्वपूर्ण घटक आहे. जागतिक तांदूळ निर्यातीत भारताचा वाटा ४० टक्के इतका आहे. भारताने गेल्या महिन्यात देशांतर्गत किमती शांत करण्यासाठी आपल्या सर्वात मोठ्या तांदूळ निर्यात श्रेणीला थांबविण्याचे आदेश दिले होते. जे अलिकडच्या आठवड्यात अनेक वर्षांच्या उच्चांकावर गेले होते.

सध्याच्या वातावरणात, या प्रकारच्या निर्बंधांमुळे उर्वरित जगामध्ये अन्नधान्याच्या किमतींमध्ये अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे, असे आयएमएफचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ पियरे-ऑलिव्हियर गौरींचास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याशिवाय तांदळाचे कमी झालेले उत्पादन हे देखील तांदळाच्या किमती वाढण्यासाठी मोठे कारण आहे.

Rice Price High : मुख्य निर्यातदार आणि आयातदार

अहवालानुसार, भारत, थायलंड, व्हिएतनाम, कंबोडिया आणि पाकिस्तान हे तांदूळ निर्यात करणार्‍यांमध्ये आघाडीवर आहेत. तर, चीन, फिलीपिन्स, बेनिन, सेनेगल, नायजेरिया आणि मलेशिया हे मुख्य आयातदार आहेत.

भारतातून गैर-बासमती पांढर्‍या तांदळाची एकूण निर्यात 2022-23 मध्ये USD 4.2 दशलक्ष होती जी मागील वर्षात USD 2.62 दशलक्ष होती. भारताच्या बिगर बासमती पांढर्‍या तांदळाच्या निर्यातीच्या प्रमुख गंतव्यस्थानांमध्ये अमेरिका, थायलंड, इटली, स्पेन आणि श्रीलंका यांचा समावेश होतो.

Rice Price High : तांदळाच्या वाढत्या किमतीचा अन्नसुरक्षेवर लक्षणीय परिणाम

तांदळाच्या वाढत्या किमतीचा अनेक देशांतील अन्नसुरक्षेवर लक्षणीय परिणाम होण्याची शक्यता आहे. जगभरातील लाखो लोकांसाठी तांदूळ हे मुख्य अन्न आहे आणि जास्त किंमतीमुळे लोकांना हे आवश्यक अन्न परवडणे अधिक कठीण होऊ शकते. अमेरिकेत देखील याचा मोठा परिणाम पाहायला मिळाला आहे. अमेरिकेत तांदूळ खरेदीसाठी दुकानाबाहेर लोकांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत. याचे व्हिडिओ गेल्या महिन्यात व्हायरल झाले होते.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT