Latest

Unmarried People Heart failure : हृदयविकारांच्या अविवाहित रुग्णात मृत्यूचे प्रमाण जास्त : युरोपमधील अभ्यास

रणजित गायकवाड

माद्रिद, पुढारी ऑनलाईन : युरोपीयन सोसायटी ऑफ कार्डिऑलॉजीने केलेल्या अभ्यासातून हृदयविकाराचा त्रास असणारे अविवाहित लोक या आजाराची काळजी घेण्यात तुलनेत असक्षम असतात, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळेच हृदय विकाराचा त्रास असणारे अविवाहित लोकांचे जीवनमान कमी असते असे या अभ्यासात म्हटले आहे. (Unmarried People Heart failure)

"दीर्घकालीन आजारांचे नियोजन करताना सामाजिक पाठबळ आवश्यक असते," असे अभ्यासक डॉ. फॅबियन केरवॅगन यांनी म्हटले आहे. ते जर्मनीतील Comprehensive Heart Failure Center at the University Hospital मध्ये कार्यरत आहेत.

"आपला जोडिदार औषधे, प्रोत्साहन देणे, आरोग्यदायी सवयी लागणे यासाठी मदत करतात. याचा थेट संबंध जीवनमान वाढण्याशी आहे. अविवाहित रुग्णांत सामाजिक संवाद कमी असतो, आणि त्यांना त्यांच्या आजाराचे नियोजन करण्याबद्दलचा आत्मविश्वास कमी असतो. आम्ही याचा आणि जीवमान उंचावण्याचा काय संबंध आहे, याचा अभ्यास करत आहोत." (Unmarried People Heart failure)

Extended Interdisciplinary Network Heart Failure (E-INH) असे या अभ्यासाचे नाव आहे. हृदयविकार असणाऱे रुग्ण आणि त्यांचा वैवाहिक जीवन यांच्यातील परस्पर संबंध जोडण्याचा प्रयत्न या अभ्यासाने केला आहे.

२००४ ते २००७ या कालावधित रुग्णालयात अॅडमिट झालेल्या १०२२ रुग्णांचा अभ्यास यात कऱण्यात आला आहे. यातील १००८ रुग्णांनी त्यांची वैवाहिक माहिती दिली होती. यातील ६३३ विवाहित तर ३७५ अविवाहित होते. (Unmarried People Heart failure)

सामाजिक मर्यादा, आयुष्याचा दर्जा, स्वतः स्वतःची काळजी घेण्याची क्षमता अशा विविध अंगाने प्रश्न विचारण्यात आले होते. शिवाय उदासिनतेवरही अभ्यास करण्यात आला.

पण विवाहित असणे किंवा नसणे याच उदासिनतेशी काही संबंध नसल्याचेही दिसून आले आहे.

या व्यक्तींचा नंतर १० वर्षं फॉलोअप घेण्यात आला. यातील ६७९ रुग्णांचे निधन झाले. यात जे विधवा किंवा विदूर होते त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले.

डॉ. केरवॅगेन म्हणाले, "ज्यांना हृदयविकाराचा आजार आहे, त्यांना सामाजिक पाठबळाची गरज असते हेच यातून दिसून येते. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांचे वैवाहिक स्थितीची माहिती घ्यावी, तसेच सपोर्ट ग्रुपची ही व्यवस्था उपलब्ध करून दिली जावी. शिक्षण महत्त्वाचे आहेच पण अशा रुग्णांचा आत्मविश्वास उंचावणेही आवश्यक आहे." ही संस्था अशा रुग्णांची दैनंदिनीचे व्यवस्थापन करण्यासाठी मोबाईल अॅप बनवत आहे.

SCROLL FOR NEXT