Latest

Imran Khan : इम्रान खान यांच्या निवासस्थानातून Ak-47 जप्त!

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या तोशाखाना प्रकरणातील अडचणी अधिकच वाढू लागल्या आहेत. पोलिसांनी खान यांच्या जमान पार्क येथील निवासस्थानातून एके-47 अ‍ॅसॉल्ट रायफल आणि गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. पंजाबचे पोलिस महानिरीक्षक (आयजीपी), उस्मान अन्वर यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या या कारवाईबाबत माहिती दिली.

 तोशाखाना प्रकरणी अटक वॉरंट जारी केल्‍याने आज ( दि. १९) इम्रान खान  इस्लामाबाद न्‍यायालयात हजर राहण्‍यासाठी निघाले. यानंतर काही तासांतच पोलिसांनी तेहरीक-ए-इन्साफ( पीटीआय ) पक्षाच्‍या कार्यकर्ते आणि इम्रान खान समर्थकांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरु केली.इम्रान खान यांच्या घरावर छापा टाकला. आयजीपी उस्मान अन्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांची जमान पार्कमधील शोध मोहीम पूर्ण झाली आहे. लाहोरमधील इम्रान खान यांच्या निवासस्थानातून एके-47 असॉल्ट रायफल आणि मोठ्या प्रमाणात गोळ्या जप्त केल्या आहेत.

तोशाखाना प्रकरणी इम्रान खान यांना आज इस्लामाबाद (Islamabad) कोर्टात हजर होण्यास सांगण्यात आले होते. इम्रान खान इस्लामाबाद न्यायालयाकडे रवाना झाल्यानंतर पाकिस्तान पोलीस त्यांच्या लाहौर येथील घरी पोहोचले. खान यांच्या पाकिस्तान तहरीक- ए -इंसाफ पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात यावेळी वाद झाला.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT