Latest

Kolhapur Lok Sabha | ब्रेकिंग! कोल्हापुरात काँग्रेसमध्ये बंड; बाजीराव खाडे यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान, कोल्हापूर काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते आणि गांधी परिवाराचे अत्यंत निष्ठावंत बाजीराव खाडे यांनी आज (दि.१९) अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात बाजीराव खाडे यांची मोठी बंडखोरी मानली जात आहे. (Kolhapur Lok Sabha)

आज पश्चिम महराष्ट्रातील लोकसभा उमेदवार म्हणून अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. दरम्यान, काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. बाजीराव खाडे हे राष्ट्रीय काँग्रेसच्या 'टीम प्रियंका'मधील महत्त्वाचे व्यक्ती आणि गांधी परिवाराचे अत्यंत निष्ठावंत मानले जातात.

आगामी लोकसभेसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर खाडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. गेले २७ वर्ष पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करून देखील पक्षाने दखल घेतली नाही, अशी खंत बाजीराव खाडे यांनी व्यक्त केली. यावेळी माध्यमांशी बोलताना बाजीराव खाडे यांना अश्रू देखील अनावर झाले. (Kolhapur Lok Sabha)

दरम्यान, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनी मंगळवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार खा. संजय मंडलिक यांनी सोमवारी दाखल केला होता.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT