Latest

RCB vs KKR : बंगळुरूचे कोलकाताला विजयासाठी 183 धावांचे लक्ष्य

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : किंग कोहली अर्थात विराट कोहलीने आपल्या होम ग्राऊंडवर पहिला सामना खेळताना नाबाद 83 धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या या तुफानाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 6 बाद 182 धावा केल्या. (RCB vs KKR)

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना किंग कोहलीने अप्रतिम कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना यजमान आरसीबीला कर्णधार फाफ डुप्लेसिसच्या रूपात मोठा झटका बसला. आरसीबीची मधली फळी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत असताना विराट कोहलीने 59 चेंडूंत नाबाद 83 धावांची खेळी केली. कॅमरून ग्रीन आणि ग्लेन मॅक्सवेलने विराटला चांगली साथ दिली. अखेरच्या काही षटकांमध्ये दिनेश कार्तिकने फिनिशिंग टच देत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. कोहलीने सर्वाधिक धावा केल्या, त्याने 59 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 83 धावा केल्या. तर, फाफ डुप्लेसिस (6), कॅमरून ग्रीन (33), ग्लेन मॅक्सवेल (28), रजत पाटीदार (3), अनुज रावत (3) धावा केल्या. दिनेश कार्तिकने 8 चेंडूंत 20 धावा ठोकत विराटला शेवटच्या दोन षटकात उत्तम साथ दिली.

केकेआरकडून आंद्रे रसेल वगळता सर्वच गोलंदाजांची धुलाई झाली. रसेल आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले, तर सुनील नरेनला 1 बळी घेण्यात यश आले. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज ठरलेल्या मिचेल स्टार्कची देखील बेकार धुलाई झाली. स्टार्कलादेखील एकही बळी घेता आला नाही आणि त्याने 4 षटकांत 47 धावा दिल्या.

संघ :

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन) : फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रमणदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

कोलकाता नाईट रायडर्स इम्पॅक्ट प्लेयर : सुयश शर्मा, वैभव अरोरा, मनीष पांडे, अंगक्रिश रघुवंशी, रहमानउल्ला गुरबाज.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इम्पॅक्ट प्लेयर : महिपाल लोमरोर, सुयश प्रभुदेसाई, कर्ण शर्मा, विजयकुमार विशक, स्वप्नील सिंग.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT