Latest

Rawalpindi to Amritsar Railway Fare : रावळपिंडी ते अमृतसर रेल्वेचे भाडे तेव्हा होते अवघे 4 रुपये

Arun Patil

नवी दिल्ली : ज्येष्ठ व्यक्तींंकडून जेव्हा आपण त्यांच्या काळातील विविध वस्तूंच्या किमती ऐकतो तेव्हा थक्क व्हायला होते. आता तर सोशल मीडियामुळे यातील काही दुर्मीळ गोष्टी जगभर सहज पोहोचू शकतात. काही दिवसांपूर्वी 37 वर्षांआधीचे एक हॉटेल बिल (Rawalpindi to Amritsar Railway Fare) सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यात शाही पनीरचा दर होता 8 रुपये, तर दाल मखनीचा दर होता 5 रुपये. आता एवढ्या रकमेत एका वेळची भाजीसुद्धा मिळत नाही. प्रवासाच्या बाबतीत हेच म्हणता येईल. भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. तथापि, सुरुवातीला दोन्ही देशांमध्ये रेल्वेने प्रवास केला जायचा. त्यावेळचे एक रेल्वे तिकीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याची जोरदार चर्चा होत आहे.

17 सप्टेंबर 1947 रोजी काढलेले हे तिकीट आहे रावळपिंडी ते अमृतसर Rawalpindi to Amritsar Railway Fare मार्गाचे. तेव्हा नऊ लोकांनी रावळपिंडी ते अमृतसर या अंतरासाठी रेल्वेचे तिकीट खरेदी केले होते. त्याची किंमत होती फक्त्त 36 रुपये आणि 9 आणे. एक आणा म्हणजे सुमारे सहा पैसे. म्हणजेच एका व्यक्तीसाठीचे भाडे होते केवळ 4 रुपये. हे तिकीट थर्ड एसीचे असून एका वेळच्या प्रवासाचे आहे. आतापर्यंत या तिकिटाला पंधरा हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. एका यूजरने त्याबद्दल लिहिले आहे की, हे तिकीट खरोखरच दुर्मीळ आहे. कारण, 75 वर्षांनंतरही ते सुस्थितीत आहे. दुसरा यूजर म्हणतो, हा कागदाचा केवळ एक तुकडा नसून ते इतिहासाचे प्रतीक आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT