Latest

Rashmi Shukla New DGP of Maharashtra मोठी बातमी : महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्लांची नियुक्‍ती

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: New DGP of Maharashtra आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे. अधिकृत घोषणा होण्यापूर्वी रश्मी शुक्ला यांचे नाव महासंचालकपदी चर्चेत होते. परंतु त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली नव्हाती. मात्र गृहविभागाच्या आदेशानुसार रश्मी शुक्ला यांची नुकतीच नियुक्ती झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या महासंचालकपदी नियुक्ती होणाऱ्या त्या पहिलाच महिला पोलीस अधिकारी आहेत, अशीही चर्चा आहे. (Rashmi Shukla)

महाविकास आघाडी सरकारच्या काळात उघडकीस आलेल्या कथित फोन टॅपिंग प्रकरणी त्यांचे नाव चर्चेत आले होते. दरम्यान काही महिन्यांच्या कालावधीनंतरत रश्मी शुक्ला यांना महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी बढती मिळाली आहे. राज्यातील सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी असल्याने त्यांना पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी देण्यात आल्याचे राज्याच्या गृह विभागाने याबाबत जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यांनी यापूर्वीचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची जागा घेतली असून, काही दिवसांपूर्वी रजनीश सेठ यांनी MPSC अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. (Rashmi Shukla)

Rashmi Shukla यांची आतापर्यंतची कारकिर्द

महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होण्यापूर्वी रश्मी शुक्ला या सशस्त्र सीमा बल या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर होत्या. त्यापूर्वी त्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) अतिरिक्त महासंचालकही होत्या. राज्य पोलिसात असताना, त्यांनी पुणे पोलिस आयुक्त म्हणूनही काम केले होते. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेवर असताना रश्मी शुक्ला यांनी राज्य गुप्तचर विभागाच्या (SID) प्रमुख म्हणून काम केले होते.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT