Latest

Pune crime news : पोलिस भरती करतो सांगून बलात्कार

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गॅझेटेड अधिकारी असल्याचे सांगून पोलिस भरतीची तयारी करणार्‍या तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार वानवडी येथील अ‍ॅकॅडमीमध्ये घडल्याचा समोर आले आहे. याप्रकरणी संशयित आरोपी अक्षय चंद्रशेखर प्रधान (27, रा. सय्यदनगर, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 31 वर्षीय तरुणीने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दाखल गुन्ह्यानुसार पीडित तरुणीला आरोपीने तो गॅझेटेड अधिकारी असल्याचे सांगून परीक्षा न देता पोलिस भरती होईल, असे आश्वासन दिले.

तिला वानवडी येथील अ‍ॅकॅडमीत बोलावून तिच्याशी जवळीक साधून तिला रिलेशनशिपमध्ये राहण्याबाबत विचारणा केली. तसेच तिला 'तू मला आवडतेस' म्हणत तिच्याशी अश्लील चाळे केले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत कोणाला सांगितले तर पोलिस भरती करणार नाही, अशी धमकी दिली. त्याने तिच्याकडून वेळोवळी एक लाख 30 हजार उकळले. त्याने इतर मुलांकडूनही भरतीसाठी पैसे उकळल्याचे तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT