Latest

Ranveer Singh : ‘हनुमान’ फेम दिग्दर्शक प्रशांत वर्माच्या बिग प्रोजेक्टमध्ये रणवीर सिंह?

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह ( Ranveer Singh ) हा एक उत्तम अभिनेता आहे. दमदार अभिनय कौशल्यामुळे त्याने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. मात्र, रणवीर सिंह गेल्या काही दिवसांपासून आगामी मोठ्या हिट चित्रपटाच्या शोधात आहे. याचदरम्यान तो बॉलिवूड ते टॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील ब्लॉकबस्टर चित्रपट दिग्दर्शकाशी चर्चा करत आहे. आता त्याला आगामी बिग प्रोजेक्ट मिळाला असून त्याच्यावर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. ही गुडन्यूज रणवीर चाहत्यांच्याना मिळाल्याने त्याचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

संबंधित बातम्या 

एका रिपोर्टच्या माहितीनुसार, सध्या रणवीरने 'हनुमान' फेम दिग्दर्शक प्रशांत वर्मा याच्याशी संपर्क साधला आहे. दोघांच्यात फोनवरून अनेक वेळा चित्रपटाच्या स्क्रिफ्ट विषयी चर्चा झाली आहे. याशिवाय रणवीरला या चित्रपटाची कथा देखील आवडली आहे. हा चित्रपट एका भारतीय पौराणिक कथेवर आधारित असणार आहे. रणवीर सिंहला पौराणिक कथांवर आधारित चित्रपटाबद्दल उत्सुक असतो. यामुळे दोघांच्या आगामी चित्रपट लवकरच येणार असल्याची चर्चा पसरली आहे.

Ranveer Singh

आगामी चित्रपटाबाबत चर्चा होऊन जवळपास ३ महिने झाले आहेत. या चर्चा अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहेत. कारण या चित्रपटासाठी एका मोठ्या फिल्म प्रोडक्शन हाऊसची गरज भासणार आहे. त्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केलं जात आहेत. मात्र, अद्याप कोणत्या फिल्म प्रोडक्शन निवडले गेलं आहे याची माहिती मिळालेली नाही. मात्र, सर्व तयारी होताच या चित्रपटाबाबत निर्माते मोठी घोषणा करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. तर या चित्रपटाचे नाव आणि त्यातील कलाकारांचीही माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.

SCROLL FOR NEXT