पुढारी ऑनलाईन डेस्क : कोणत्याही उत्पादनांच्या विक्रीसाठी नवनव्या जाहिराती येत राहतात. यामध्ये क्रिएटिविटीचा असा तडका पाहायला मिळतो, की पाहणारे दंग राहतात. अशीच एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जाहिरातीत रणवीर सिंह आणि पोर्न स्टार जॉनी सिंस यांनी काम केले आहे. जाहिरातीमध्ये रणवीर सिंहला (Ranveer Singh) पाहून नेटकऱ्यांना विश्वास बसला नाही. ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी कॉमेंट्सचा वर्षाव केला. अनेक नेटकऱ्यांनी ही जाहिरात खूप मजेत घेत कॉमेंट्स केले आहेतत. तर रणवीर हा पोर्न स्टार जॉनी सिंस सोबत दिसल्याने काही नेटकऱ्यांना ते पचनी पडलेले नाही. (Ranveer Singh)
संबंधित बातम्या –
ही जाहिरात पुरुषांच्या सेक्शुअल हेल्थ औषधसंबंधी आहे. या जाहिरातीत बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहसोबत पोर्न स्टार जॉनी सिंसने काम केलं आहे. या जाहिरातीची पहिली झलक सर्वांना दंग करणारी आहे. यामध्ये मॅलोड्रामॅटिक म्युझिकसह एक टीव्ही मालिका पाहायला मिळतेय. ज्यामध्ये लहान सून घर सोडून जात असताना दिसते. मोठा दिर म्हणजेच रणवीर सिंह त्याला थांबवतो आणि म्हणतो – काय झालं, तू इथे आनंदात नाहीस का?
यावर जाहिरातीत ती आपला पती जॉनी सिंस सोबतचे खराब सेक्शुअल लाईफ विषयी सांगते. यानंतर घरातील एक वृद्ध महिला तिला थप्पड मारते आणि खूप ड्रामॅटिक पद्धतीने छतावरुन खाली पडते. जाहिरातीत रणवीर सेक्शुअल हेल्थशी संबंधी औषधांची केअर ॲड करताना दिसतो. जाहिरातीत जॉनीने भारतीय कपडे कुर्ता पायजमा घातलेला दिसतो.
लोकांनी काय कॉमेंट्स केले आहेत. एका युजरने लिहिलं- "रणवीर सिंह आणि जॉनी …काय क्रॉसओवर आहे.' आणखी एकाने लिहिलं, 'मला आधी वाटलं की, डीपफेक आहे. परंतु, रणवीर सिंह तर रणवीर सिंह आहे!!!' अन्य एकाने लिहिलं- रणवीरसोबत जॉनी…सांगा हे खोटं आहे.
दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं- 'कमालीची जाहिरात आहे आणि याची क्रिएटिव्हीटी ज्यांनी केली आहे, तो तर अप्रतिमचं.' एका युजरने मजेत लिहिलं- 'विचित्र आहे की, एक पोर्न स्टारदेखील इंडियामध्ये अंडर परफॉर्म करत आहे.'
टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई हिने या ॲड शूटवर संताप व्यक्त केला आहे. या ॲडच्या माध्यमातून टीव्ही इंडस्ट्री एक मजेशीर गोष्ट बनलीय. व्हायरल झालेली रणवीर सिंहची ही जाहिरात पाहून तिला राग आला. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रतिक्रिया देत लिहिलं-
'मी माझं काम रीजनल फिल्म इंडस्ट्रीतून सुरू केला आहे आणि मग टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करणं सुरु केलं. लोक याला छोटी स्क्रीन म्हणतात. ही रील पाहिल्यानंतर अजिबात अपेक्षा नव्हती. मला वाटलं की, हा संपूर्ण टीव्ही इंडस्ट्री आणि त्यामध्ये काम करणाऱ्या लोकांचा अपमान आहे. कारण, आम्हाला नेहमी कमी लेखलं जातं. आणि तसा व्यवहार देखील केला जातो. पण, मी माफी मागते, टीव्ही शोवर हे सर्व दाखवलं जात नाही…हे सर्व मोठ्या स्क्रीनवर दाखवलं जातं. मी गरजेपेक्षा अधिक प्रतिक्रिया देत आहे. लेकिन आम्ही आपल्या प्रेक्षकांना संस्कृती आणि प्रेम दाखवतो.' 'वास्तव दाखवण्यात काही अयोग्य नाही, पण वास्तवात संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीसाठी हे अपमानजनक आहे. माझं मन दुखावलं आहे. कारण टीव्ही इंडस्ट्री माझ्यासाठी सन्मानजनक प्रवास राहिलेला आहे. अपेक्षा आहे की, तुम्ही भावनांना समजून घ्याल.'