Latest

Don 3 Big Announce : रणवीरसोबत कियाराची जोडी! निर्मात्यांची घोषणा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : फरहान अख्तर दिग्दर्शित 'डॉन ३' ची घोषणा झाल्यानंतर #Don 3 हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे. (Don 3 Big Announce) या चित्रपटाची चर्चा यासाठीही सुरु आहे की, अभिेता रणवीर सिंहसोबत कियारा आडवाणी झळकणार आहे. चित्रपटामध्ये शाहरुख खान ऐवजी रणवीर सिंह असणार आहे. ह घोषणा झाल्यानंतर चित्रपटाची चर्चा होऊ लागलीय. निर्मात्यांनी खुलासा केला आहे की, 'डॉन 3' मध्ये रणवीरसोबत कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. निर्मात्यांनी पोस्ट शेअर करून डॉन युनिव्हर्समध्ये अभिनेत्रीचे स्वागत केले आहे. (Don 3 Big Announce)

संबंधित बातम्या –

डॉन आणि डॉन २ मध्ये शाहरुख खानचा अभिनय पाहिल्यानंतर आता फॅन्स रणवीर सिंहचा अभिय पाहायला उत्सुक आहेत. खूप आधी निश्चित झाले होते की, रणवीर सिंहच डॉन होईल. पण निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा होणे बाकी होते. आता मंगळवारी निर्मात्यांनी स्टार कास्ट विषयी घोषणा केली आहे.

कियाराची तुफान एन्ट्री

डॉन ३ मध्ये रणवीरसोबत कियाराची भूमिका असेल. एक्सल मुव्हीजने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने कियाराचे डॉनच्या युनिव्हर्समध्ये स्वागत केलं आहे. कियाराने देखील याबद्दल आनंद व्यक्त करत एक्स अकाऊंटवर लिहिलं आहे- 'हा आयकॉनिक डॉन फ्रेंचायजी- आणि शानदार टीमसोबत जोडून खूप खुश आहे. या एक्सायटिंग जर्नीसाठी आपलं प्रेम आणि पाठिंब्याची गरज आहे.'

SCROLL FOR NEXT