Latest

83 movie : अभिनेता रणवीर सिंगसह क्रिकेट दिग्‍गजांना अश्रू अनावर…

नंदू लटके

मुंबई : पुढारी ऑनलाईन

१९८३ हे वर्ष भारतीय क्रिकेट इतिहासातील सुवर्ण पान. या वर्षी भारताने क्रिकेट विश्‍वचषकावर आपलं नाव कोरलं. क्रिकेटमध्‍ये आंतरराष्‍ट्रीय पातळीवर भारताने मिळवलेले हे ऐतिहासिक यश होतं. जगात कोठेही भारतीय जिंकू शकतो, असा आत्‍मविश्‍वास देणारे हे यश ठरलं. त्‍यामुळे आजही प्रत्‍येक भारतीयाला क्रिकेटमधील या यशाचा अभिमान वाटतो.

१९८३ क्रिकेट विश्‍वचषक स्‍पर्धेवर आधारित बहुचर्चित ८३ हा चित्रपट ( 83 movie ) २४ डिसेंबर रोजी रिलीज होत आहे. चित्रपट रिलीज होण्‍यापूर्वीच समीक्षकांची या भरभरुन दाद मिळत आहे. १९८३च्‍या भारतीय संघातील खेळाडू व निवडक मान्‍यवरांसाठी या चित्रपटाच्‍या खास शोचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी भारतीय क्रिकेटचे १९८३ मधील यशाच्‍या आठवणीने ८३ चित्रपटात कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार्‍या रणवीर सिंगसह क्रिकेट दिग्‍गजांना अश्रू अनावर झाले.

८३च्‍या ( 83 movie ) खास शोसाठी कपिल देव, सुनील गावस्‍कर, सय्‍यद किरमानी, के. श्रीकांत, किर्ती आझाद आणि संदीप पाटील यांची प्रमुख
उपस्‍थिती होती. यावेळी रणवीर म्‍हणाला की, माझ्‍यासाठी हा अविस्‍मरणीय क्षण आहे. हा क्षण शब्‍दात व्‍यक्‍त करता येणार नाही, असे सागंत त्‍याला अश्रू अनावर झाले. यावेळी कपिल देव, सय्‍यद किरमानी, आणि किर्ती आझाद यांनीही आपल्‍या भावनांना वाट करुन दिली.

83 movie : गावस्‍कर यांचे चालणे वाघाप्रमाणे…

८३ या चित्रपटात ताहिर राज भसीन याने सुनील गावस्‍कर यांची भूमिका साकारली आहे. त्‍याने यावेळी सांगितले की, ही भूमिका साकारण्‍यापूर्वी मी यू ट्‍यूबवर सुनील गावस्‍कर यांचे अनेक व्‍हिडिओ पाहिले. याचे चालणे कोणासारखे आहे, असा प्रश्‍न मला पडला होता. यानंतर सर्व व्‍हिडिओ मी स्‍लो मोशन करुनही पाहिले. त्‍यावेळी मला समजले की, सुनील गावस्‍कर यांची चालणे हे एका वाघाप्रमाणे आहे.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT