पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor ) यांच्या नव्या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. दिग्दर्शक लव रंजन यांच्या चित्रपटात पहिल्यांदाच ते स्क्रीन शेअर करणार आहेत. आता निर्मात्यांनी चित्रपटाचे शीर्षक TJMM सांगितले आहे. आणि सिनेप्रेमींना या चित्रपटाचे नाव ओळखण्याचा टास्कदेखील दिला आहे. (Shraddha Kapoor )
निर्मात्यांनी शेअर केलेल्या पोस्टरवर TJMM लिहिले आहे. तथापि, निर्मात्यांनी सांगितले की, ते १४ डिसेंबरला म्हणजेच बुधवारी चित्रपटाचे नाव जाहीर करणार आहेत. यासोबतच निर्मात्यांनी रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरसोबतच्या पहिल्या चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर केली आहे.
रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा हा चित्रपट ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या चित्रपटाबाबत अपडेट दिले आहे. त्यांनी त्याच्या ट्विटर हँडलवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. यासोबत लिहिले आहे की, 'रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या लव रंजन दिग्दर्शित चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा बुधवारी होणार आहे. TJMM चित्रपटाच्या शीर्षकाचा अंदाज लावा. हा चित्रपट ८ मार्च, २०२३ रोजी होळीला प्रदर्शित होणार आहे.
रणबीर कपूर शेवटचा 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता रणबीर कपूर दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या 'अॅनिमल' चित्रपटातही काम करणार आङे. या चित्रपटात रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असेल. २०२० मध्ये रिलीज झालेल्या 'बागी ३' चित्रपटात श्रद्धा कपूर शेवटची दिसली होती. आता ती या चित्रपटात रणबीर कपूरसोबत काम करताना दिसणार आहे. ही पहिलीच वेळ असेल जेव्हा श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.
हेही वाचा :