Latest

Ram Mandir Inauguration : अयोध्येतील राम मंदिर कार्यक्रम धार्मिक नसून पुर्णपणे राजकीय, भाजपच्या टीकेवर कॉंग्रेसचा पलटवार

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा; हिंदू धर्मात चार शंकराचार्यांना मोठे महत्व आहे. हे चारही शंकराचार्य अयोध्येतील राम मंदिर कार्यक्रमाला जाणार नाही. या कार्यक्रमात धर्मशास्त्राला महत्व देण्यात आले नाही. अर्धवट मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करता येत नाही असे चारही पीठांच्या शंकराचार्यांनी सांगितले. हा कार्यक्रम धार्मिक नसून पुर्णपणे राजकिय आहे, असा पलटवार कॉंग्रेसने केला आहे. (Ram Mandir Inauguration)

कॉंग्रेसने राम मंदिर कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपने कॉंग्रेसला चांगलेच फटकारले होते. काँग्रेसने राम मंदिर कार्यक्रमावर टाकलेला बहिष्कार काँग्रेसचा भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माला असलेला विरोध दर्शवतो. अशी जळजळीत टीका भाजपच्या वतीने करण्यात आली. तर भाजपसह विविध संघटनांनी कॉंग्रेसवर टीकेची झोड उठवली होती. यावर मंदिरात जायला एखाद्या राजकीय पक्षाच्या निमंत्रणाची गरज आहे का? असा प्रश्न काँग्रेसच्या वतीने विचारण्यात आला. तसेच राम मंदिरातीस कार्यक्रमासाठी तारीख निवडली गेली नाही तर निवडणूक पाहून तारीख निवडली गेली म्हणत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकाही केली.

शुक्रवारी कॉंग्रेस मुख्यालयात पत्रकार परीषद घेत कॉंग्रेसचे राष्ट्रीय़ प्रवक्ते पवन खेडा आणि सुप्रिया श्रीणेत यांनी भाजपवर हल्ला चढवला.
यावेळी बोलताना पवन खेडा म्हणाले की, एका व्यक्तीच्या राजकीय नाटकासाठी आम्ही आमच्या आस्थेचा खेल मांडु देणार नाही. प्रभु श्रीराम अयोध्येत आले तेव्हा संपूर्ण प्रजा त्यांच्या स्वागतासाठी आली होती मात्र इथे व्हीआयपी लोकांची रांग लावली आहे आणि सामान्य माणसाला दुर ठेवण्यात आले आहे. हिंदू धर्मातील सर्व शंकराचार्यांची इच्छा होती की रामनवमीला विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी. मात्र केवळ एका व्यक्तीसाठी या कार्यक्रमाचे राजकीयीकरण केले जात आहे. कॅमेऱ्याची फौज घेऊन प्राणप्रतिष्ठा करणारे तुम्ही कोण आहात असा सणसणाटी टोलाही त्यांनी लगावला. (Ram Mandir Inauguration)

काही जाहिरातींचा संदर्भ देते पवल खेडा म्हणाले की, प्रभू श्रीराम लोकांना चांगल्या मार्गावर चालायला शिकवतात, असे सर्वांना वाटते मात्र आता देवालाच बोट धरून मंदिरात नेले जात आहे. निवडणूक आयोग, माध्यम संस्था, महालेखापाल निरीक्षक अशा महत्वाच्या संस्थांवर एकच व्यक्ती नियंत्रण ठेवतात. आता ते धार्मिक क्षेत्रातही नियंत्रण ठेवू पाहत आहेत. धर्म हा व्यक्तिगत आस्थेचा विषय आहे. मात्र त्याचे राजकीयीकरण केले जात आहे, असेही ते म्हणाले. (Ram Mandir Inauguration)

दरम्यान, यावेळी बोलताना सुप्रिया श्रीणेत म्हणाल्या की, उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी १५ जानेवारीला अयोध्येतील मंदिरात जाणार आहेत. धर्म हा प्रत्येकाच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे काँग्रेसबद्दल बोलणाऱ्या लोकांनी सर्व शंकराचार्य का या कार्यक्रमाला जाणार नाही आहेत, याकडे लक्ष द्यावे, असेही त्या म्हणाल्या.

काँग्रेसने सुरू केलेल्या देणगी मोहिमेचे क्यूआर कोड आणि वेबसाईटमध्ये काही तांत्रिक त्रुटी आढळल्या होत्या. यावर बोलताना वेगळी टीम यावर काम करत होती. याबद्दल अधिक माहिती नाही. काही त्रुटी आढळल्यास त्या दुरुस्त करण्यात आल्या हेत. मात्र चर्चा मूळ मुद्द्यांवर झाली पाहिजे असे त्या म्हणाल्या. एक प्रकारे त्रुटी झाल्याचे त्यांनी कबूल केले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT