नवी दिल्ली : येत्या 22 तारखेला अयोध्येत होणार्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला हजर न राहण्याचा निर्णय चारही शंकराचार्यांनी घेतला आहे. (Ram Mandir Inauguration)
आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या जोशीमठ, द्वारका, पुरी आणि शृंगेरी या चार पीठांच्या शंकराचार्यांनी हा निर्णय घेतला आहे. पुरी आणि जोशी मठाच्या शंकराचार्यांनी या सोहळ्यात धर्मशास्त्राचे पालन होत नसल्याने आपण जाणार नसल्याचे म्हटले आहे. द्वारका आणि शृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांनीही आपण या सोहळ्याला हजर राहणार नसल्याचे सांगितले आहे. (Ram Mandir Inauguration)
अयोध्या : प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याआधी शरयू नदीवर 21 हजार पुरोहित प्रभू श्रीराम यांच्यासाठी रामनाम महायज्ञ करणार आहेत. 14 ते 25 जानेवारीदरम्यान हा यज्ञ सुरू राहणार आहे. या महायज्ञासाठी नेपाळमधून पुरोहित येणार आहेत. शरयू नदीवर यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. महायज्ञाच्या ?ठिकाणी 50 हजार भक्तांची व्यवस्था होणार आहे. याशिवाय महायज्ञाच्या कालावधीत 1 लाख भाविकांच्या प्रासादाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
हेही वाचा :